Mohammed Shami sakal
क्रीडा

Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध ODI मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर...

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का...

Kiran Mahanavar

India vs Bangladesh ODI Series : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या हाताला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बांगलादेश दौऱ्यावर भारताला तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका 4 डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून सुरू होत आहे. शमी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांचा भाग आहे, पण दुखापतीमुळे तो 1 डिसेंबर रोजी उर्वरित भारतीय संघासोबत बांगलादेशला गेला नाही.

बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले की, 'ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर सरावा दरम्यान मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली होती. त्याला NCA ला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. टी-20 विश्वचषक 2022 नंतर शमीसह रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात होती. मोहम्मद सिराज, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि युवा खेळाडू कुलदीप सेन हे चार वेगवान गोलंदाज आधीच संघात आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआय शमीच्या बदलीची घोषणा करेल अशी शक्यता कमी आहे.

दुखापत गंभीर झाल्यास शमी 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. सूत्राने सांगितले की, 'तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शमीची अनुपस्थिती निश्चितच एक घटक आहे, परंतु सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कसोटी मालिका ज्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला आक्रमणाचे नेतृत्व करावे लागेल.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.

बांगलादेशचा भारत दौरा

  • 4 डिसेंबर, पहिला एकदिवसीय (ढाका) सकाळी 11.30 वाजता

  • 7 डिसेंबर, दुसरी वनडे (ढाका) सकाळी 11.30 वाजता

  • 10 डिसेंबर, 3रा ODI (ढाका) सकाळी 11.30 वाजता

  • 14-18 डिसेंबर, पहिली कसोटी (चटगाव)

  • 22-26 डिसेंबर, दुसरी कसोटी (ढाका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT