Mohammed Shami India Vs New Zealand Semi Final 
क्रीडा

Mohammed Shami : हुश्श जोडी फुटली एकदाची...! शमीनेच ह्रदयाचे ठोके वाढवलं अन् त्यानंच दिलासाही दिला

Kiran Mahanavar

Mohammed Shami India Vs New Zealand Semi Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड कपच्या 2023 उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

विराट कोहलीने एकदिवसीय शतकातील अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले, ज्यामुळे भारताने येथे न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप उपांत्य फेरीत चार गडी गमावून 397 धावांची मजल मारली.

कोहलीने 117 चेंडूत 113 धावा केल्या, तर अय्यरने 70 चेंडूत 105 धावा केल्या. या दोघांनी 128 चेंडूत 163 धावा जोडल्या. तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली, तर शुभमन गिलने अखेरच्या षटकात पुनरागमन करत 66 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.

भारताच्या 397 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र सहाव्या षटकात डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने किवीजला पहिला धक्का बसला. यानंतर शमीने पुन्हा एकदा आठव्या षटकात रचिन रवींद्रला आऊट करून न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का दिला.

सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारतीय गोलंदाज लवकरच न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवतील असे वाटत होते, पण डॅरिल मिशेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी अप्रतिम भागीदारी करत 28 षटकांत धावसंख्या 180 धावांपर्यंत नेली. यानंतर 29व्या षटकात जसप्रीत बुमराह आला, आणि त्याने केन विल्यमसनला जवळपास आऊट केले पण शमीच्या निष्काळजीपणामुळे तो कॅच सुटला. त्यानंतर संपूर्ण चाहत्यांना वाटलं की भारताने हा सामना गमावला.

या कॅच ड्रॉपच्या घटनेनंतर फक्त 3 षटके झाली होती. आणि कर्णधाराने शमीवर विश्वास व्यक्त केला आणि 33 व्या षटकात त्याला चेंडू दिला. शमीने दुसऱ्याच चेंडूवर आपली चूक सुधारत केन विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर टॉम लॅथमला शून्यावर आऊट केले. अशाप्रकारे शमीने केवळ धावसंख्येवर तोडगा काढला नाही तर सामना भारताच्या झोळीत आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT