Mohammed Shami's Wife Hasin Jahan sakal
क्रीडा

Hasin Jahan : मोहम्मद शमीच्या पत्नीसोबत ट्रेनमध्ये गैरवर्तन! तिकीट चेकर वर गंभीर आरोप

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँसोबत गैरवर्तनाचे प्रकरण आले समोर; सोशल मीडियावर सांगितली कहाणी

Kiran Mahanavar

Mohammed Shami's Wife Hasin Jahan : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँसोबत गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे तिकीट चेकरवर त्यांनी गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेची कहाणी हसीन जहाँने सोशल मीडियावर सांगितली आहे. शेवटी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात मदत करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या टीमचेही आभार मानले आहेत.

बिहारमधील कटिहारहून कोलकात्यात परतत असताना आपल्यासोबत हे गैरवर्तन झाल्याचे हसीन जहाँचे म्हणणे आहे. हसीन जहाँने सांगितले की, मी माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बिहारला गेले होते. उड्डाणाची सोय नव्हती. जोगबानी ट्रेनने कोलकात्याला परत येत होते. माझे डब्यात 6 नंबरची सीट होती. तेथे 7 क्रमांकाची जागाही रिक्त होती. इतर प्रवासीही होते. एका प्रवाशाने मला सांगितले की 7 नंबर रिकामा आहे. तुम्ही त्यावर झोपा. मी चादर अंगावर घेऊन झोपले.

जेव्हा मालदा स्टेशन आले तेव्हा टीटीई एका सहकाऱ्यासोबत आला. माझी चुकीची चौकशी करू लागला. त्याने माझी चादर आणि मोबाईल सर्व फेकून दिले. मी रेल्वे हेल्पलाइनवर तक्रार केली. पुढच्या स्टेशन फरक्का येथून पोलिसांचे पथक आले. माझी तक्रार ऐकून घेतली. यानंतर पोलिस संरक्षणात मी कलकत्त्याला आले. त्याबद्दल रेल्वे पोलीस पथकाचे आभार. पण या गैरवर्तनाने मी खूप अस्वस्थ झालो. मला माहित नाही की त्याने सामान्य लोकांशी कसे वागले असेल.

हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचे 2014 साली लग्न झाले होते. चार वर्षांनंतर 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर अनेक आरोप केले. यामध्ये घरगुती हिंसाचारापासून मॅच फिक्सिंगपर्यंतच्या गंभीर आरोपांचा समावेश होता. मात्र बीसीसीआयच्या तपासात शमीवरील कोणताही आरोप खरा ठरू शकला नाही. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT