mohammed siraj argues with umpire  sakal
क्रीडा

Video : सिराजने 'जोश'मध्ये आधी स्वतः केली चूक, मग पोहोचला अंपायरशी भांडला

भर मैदानात अंपायरवर भिडला मोहम्मद सिराज, अंपायसमोर केलं हे कृत्य…

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd ODI : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या सामन्यातून मालिकेचा निर्णय होणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सामन्यादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही चर्चेत राहिला. तो भर मैदानात अंपायरवर भिडला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वातावरण चांगलेच तापले. मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 48 वे षटक टाकण्यासाठी आला. मोहम्मद सिराजच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजला खेळता आला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. संजूने सिराजच्या दिशेने चेंडू फेकला. यानंतर सिराजने मिलरला धावबाद करण्याच्या उद्देशाने नॉन-स्ट्राइक एंडला चेंडू फेकला. चेंडू स्टंप चुकला आणि सीमारेषेबाहेर गेला, त्यानंतर पंचांनी दक्षिण आफ्रिकेला बाय म्हणून चार धावा दिल्या. पंचांच्या निर्णयावर सिराज नाराज झाला आणि त्याने पंचांशी वाद घातला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सात विकेट गमावत 278 धावा केल्या. एडन मार्करामने 79 आणि रीझा हेंड्रिक्सने 74 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. या दोघांशिवाय डेव्हिड मिलरने नाबाद 35 धावांची उपयुक्त खेळी खेळली. भारताकडून मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करताना नाबाद 113 धावा केल्या. तर इशान किशनने 93 धावांचे योगदान दिले. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची अप्रतिम भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT