Mohammed Siraj IND vs SL 3rd ODI  ESAKAL
क्रीडा

Mohammed Siraj VIDEO : पोज माराणाऱ्या करूणारत्नेचा झाला पोपट; डायरेक्ट थ्रो मारत सिराजने केला गेम

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj IND vs SL 3rd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या धारधार गोलंदाजीने लंकेची टॉप ऑर्डर उडवली. मात्र त्याच्या या विकेट्सपेक्षा चमिका करूणारत्नेला ज्या प्रकारे धावबाद केले त्याचीच जोरदार चर्चा होत आहे.

श्रीलंकेची अवस्था 5 बाद 37 धावा केल्यानंतर सिराज सामन्याचे 12 वे षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू चमिका करूणारत्ने फलंदाजी करत होता. षटकाच्या दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर सिराज आणि लंकाचा उत्साही कार्यकर्ता असलेल्या करूणारत्नेमध्ये शाब्दिक देवाण घेवाण झाली होती.

त्यानंतर सिराजचा चौथा चेंडू चांगल्याप्रकारे आडवत करूणारत्ने आपल्या फलंदाजीची पोज मिरवत होता. हे पाहून सिराजने करूणारत्नेच्या दिशने चेंडू थ्रो केला. हा थ्रो करूणारत्नेच्या पायाजवळून थेट विकेट्सवर आदळला. पोज मारण्याच्या नादात करूणारत्ने क्रिजच्या बाहेर कधी गेला हे त्यालाही कळले नाही. मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला अन् पोज मारणारा करूणारत्ने अवघ्या 1 धावेवर धावबाद झाला.

मोहम्मद सिराजने नवीन चेंडूवर लंकेची अवस्था फार बिकट करून टाकली होती. त्याने लंकेच्या पहिल्या 5 विकेट्समधील 4 विकेट्स एकट्याने मिळवत लंकेची अवस्था 5 बाद 37 अशी केली होती. त्यानंतर करूणारत्नेला धावबाद करत त्यांचा 6 वा फलंदाज 39 धावांवर माघारी पाठवला.

तत्पूर्वी, भारताने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 391 धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी (110 चेंडूत 166 धावा खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 390 धावांपर्यंत मजल मारली. विराटला शुभमन गिलने 116 धावांची शतकी खेळी करत चांगली साथ दिली. रोहित शर्माने 42 तर श्रेयस अय्यरने 38 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT