Mohammed Siraj Litton Das Heated Conversation esakal
क्रीडा

VIDEO : विराटने दासची जिरवली! अंगावर येणाऱ्या लिटनला सिराजने घेतले शिंगावर

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj Litton Das Heated Conversation : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि बांगलादेशचा फलंदाज लिटन दास यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाल्याचे दिसले. या वादात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या उत्साही विराट कोहलीने देखील उडी घेतली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने आपला पहिला डाव लंचपूर्वी सुरू केली. मात्र सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने नजमुल हुसैन शांतोला बाद करत दमदार सुरूवात केली. त्यानंतर उमेश यादवने यासीर अलीला 4 धावांवर बाद केले. बांगलादेशच्या झटपट दोन विकेट्स पडल्यानंतर लिटन दास आणि झाकीर हसन यांनी बांगलादेशचा डाव सावरण्यास सुरूवात केली.

लिटन दासने 30 चेंडूत 24 धावा करत आक्रमक सुरूवात केली होती. याचदरम्यान, मोहम्मद सिराज आणि त्याची 13 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाब्दिक वादावादी झाली. सिराजने लिटन दासकडे पाहून काहीतरी म्हटले. तो काय म्हणतो हे ऐकू न आल्याच्या अविर्भावात तो सिराजच्या दिशेने येत होता. त्यावेळी तो आपल्या कानाला हात लावत लक्ष देऊन ऐकण्याची अॅक्टिंग करत होता. दरम्यान, पंचांनी मोहम्मद सिराज आणि लिटन दास यांच्यात मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले.

मात्र 13 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने लिटन दासचा त्रिफळा उडवला. यावेळी सिराजने तोंडावर बोट ठेवत लिटनला आता शांतपणे घरी जा असे संदेश दिला. तर दुसरीकडे स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने लिटन दासची कानावर हात ठेवून लक्षपूर्व ऐकत असल्याची अॅक्टिंग करत त्याची चेष्टा केली. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्यानंतर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशची अवस्था 8 बाद 133 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवत 14 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू कुलदीप यादवने 33 धावात 4 बळी टिपत बांगलादेशची मधली फळी उद्ध्वस्त केली. उमेश यादवने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT