Mohammed Siraj Man Of The Match  esakal
क्रीडा

Mohammed Siraj : रोहित भाई म्हणाला एन्जॉय... सिराजनं सांगितलं 'पाटा' खेळपट्टीवर कसा झाला मॅन ऑफ द मॅच?

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj Man Of The Match : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या. त्यानंतर भारताने विंडीजचा पहिला डाव 255 धावात गुंडाळला. पोर्ट ऑफ स्पेनच्या पाटा खेळपट्टीवर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चौथ्या दिवशी पहिल्या तासभरताच विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

मोहम्मद सिराजने पाटा खेळपट्टीवर क्रिज आणि आपल्या स्विंगचा उत्तम प्रकारे वापर करत विंडीजच्या 5 विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात टाकलेल्या त्याच्या या स्पेलमुळेच भारताच्या कसोटी जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या.

त्यामुळेच मोहम्मद सिराजला विराट कोहलीने शतक (121) आणि रोहित शर्माने दोन्ही डावातील अर्धशतके (80, 57) ठोकूनही सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामनाविराचा पुरस्कार मिळाल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, 'हा कसोटी क्रिकेटमधील माझा पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. मला खूप आनंद झाला आहे. या खेळपट्टीत वेगवान गोलंदाजांसाठी फारसे काही नव्हते.'

'मी माझी रणनिती सोपी ठेवली आणि ती अंमलात आणली. ज्यावेळी तुम्ही पाटा खेळपट्टीवर विकेट्स घेता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास गगणाला भिडतो. रोहित भाईने मला माझ्यावर विश्वास ठेवून कोणताही दबाव न घेता एन्जॉय कर असा सल्ला दिला होता.'

(Sport Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT