MS Dhoni Attend Wimbledon Quarter Final Watch favorite Rafael Nadal Fight Back Match  esakal
क्रीडा

MS Dhoni |'फेव्हरेट' नदालच्या झुंजार विजयाचा धोनी साक्षीदार

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज (दि. 7 जुलै) 41 वर्षाचा होतोय. वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या माजी कर्णधारावर करोडो फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आपला 41 वा वाढदिवस (Birthday) भारतात नाही तर इंग्लंडमध्ये साजरा केला. विशेष म्हणजे भारतीय संघ देखील सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र धोनी टीम इंडियासाठी इंग्लंडमध्ये गेलेला नसून तो इंग्लंडमध्य सुरू असलेल्या विम्बल्डनमध्ये (Wimbledon) राफेल नदालचा (Rafael Nadal) सामना पाहण्यासाठी गेला होता. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपल्या आवडत्या राफाचा सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने विम्बल्डनच्या सेंट्रल कोर्टवर उपस्थिती दर्शवली. याबाबतची माहिती विम्बल्डनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. धोनी स्टँडमध्ये बसून राफेल नदालचा रोमांचक सामना पाहत असतानाचा फोटो विम्बल्डनने शेअर केला. त्याला 'भारताचा दिग्गज सामना पाहत आहे असे कॅप्शन दिले.' यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने देखील हाच फोटो शेअर केला.

क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने क्वार्टर फायनल सामन्यात दुसऱ्या सेटवेळी वैद्यकीय टाईम आऊट घेतला होता. तेथून पुनरागमन करत राफेल नदालने सामना 3-6, 7-5, 3-6, 7-5, 7-6 (10/4) असा जिंकला. हा सामना तब्बल 4 तास 21 मिनिटे सुरू होता. हा सामना पाहण्यासाठी डेव्हिड बेकहॅम आणि सुनिल गावसकर देखील उपस्थित होते. धोनी हा राफेल नदालचा चाहता आहे. त्यामुळे धोनीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी राफेल नदालने झुंजार विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT