MS Dhoni Birthday MS Dhoni Birthday Special Gift 41 Feet Cutout  esakal
क्रीडा

धोनीच्या वाढदिवसादिवशी आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट

अनिरुद्ध संकपाळ

विजवाडा : भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni Birthday) येत्या 7 जुलैला 41 वर्षाचा होतोय. क्रिकेट जगतात निवृत्तीनंतरही महेंद्रसिंह धोनीची चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी त्याच्या निवृत्तीनंतरही चाहते वेडे आहेत. यामुळेच धोनीच्या 41 व्या वाढदिवसादिवशी आंध्र प्रदेशमधील (MS Dhoni Birthday ) विजयवाडा येथील त्याचे चाहते त्याला एक खास गिफ्ट देणार आहे.

महेंद्रसिंह धोनी गुरूवारी (7 जुलै) रोजी आपला 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सीएसकेचा कर्णधार असलेल्या धोनीसाठी त्याच्या चाहत्यांनी एक खास गिफ्ट तयार केले आहे. भारताच्या या माजी क्रिकेटपटूच्या 41 व्या वाढदिवसादिवशी आंध्र प्रदेशमधील विजयावाडामध्ये 41 फूट त्याचे कटाऊट (Cutout) लावण्यात आले आहे. या कटाऊटमध्ये धोनी आपल्या सिग्नेचर हेलिकॉप्टर शॉ खेळताना दिसत आहे.

धोनीबद्दल अशा प्रकारे आपले प्रेम व्यक्त करण्याची ही नवी पद्धत नाही. या पूर्वीही धोनीचे मोठमोठे कटाऊट्स लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) गेला आयपीएल हंगाम फारसा चांगला गेला नाही. मात्र याच हंगामात धोनीने बॅटिंगमध्ये आपला फॉर्म पुन्हा मिळवला. धोनीने 14 सामन्यात 123 च्या स्ट्राईक रेटने 232 धावा केल्या. त्याने एक अर्धशतक देखील झळकावले. चेन्नईने हंगामाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार केले होते. मात्र हंगामाच्या मध्यावरच जडेजाने कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT