MS Dhoni 
क्रीडा

पुण्यात 'धोनीऽऽ धोनीऽऽचा जयघोष 

पांडुरंग सरोदे, योगेश बनकर

पुणे : 'धोनीऽऽ.. धोनीऽऽ...' संपूर्ण सभागृहामध्ये हाच आवाज होता. कारण स्पष्ट आहे.. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज (शनिवार) पुण्यात होता. निमित्त होते 'सकाळ प्रकाशना'च्या सुनंदन लेले लिखित 'कांगारू' या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाचे.. 

धोनी सभागृहात दाखल झाल्यापासून उपस्थितांनी त्याच्या नावाचा जयघोष करण्यास सुरवात केली. धोनीनेही मनसोक्त 'बॅटिंग' केली. 

'कष्टाला पर्याय नाही.. भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगण्यापेक्षा वर्तमानात जगा' असा सल्ला धोनीने देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भारतीय संघाचे कर्णधारपद, यष्टिरक्षकाची भूमिका, संघाला प्रोत्साहित करणे आणि जिंकण्यासाठीचे कष्ट या सर्व गोष्टींवर धोनीने लेले यांच्याशी संवाद साधला. 

तुम्हाला चांगला क्रिकेटपटू म्हणून 15 वर्षे लोक ओळखतील. पण त्यानंतर काय? म्हणून मी कायम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत असतो. चांगला माणूसच कायम लोकांच्या स्मरणात राहतो. 
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा यष्टिरक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: नेपाळमध्ये निदर्शकांनी पंचतारांकित हॉटेल पेटवलं, एका भारतीय महिलेचा मृत्यू, अनेक लोक अडकले

राजकीय पक्षांच्या नोंदणीवर संकट? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश! निवडणूक आयोगाला फक्त 4 आठवड्यांत द्यावं लागणार उत्तर

Pune News: महापालिकेने वाकड आणि ताथवडेतील अतिक्रमणावर केले कडक पाऊल, ४३ झोपड्यांचा नाश

Banjara Reservation: नवा वाद! बंजारा समाजाला 'एसटी'तून आरक्षण नको; आदिवासी समाजाचा रास्ता रोको

Duleep Trophy Final: रजत पाटीदारचे खणखणीत शतक! भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा; श्रेयसच्या मार्गात ठरणार अडथळा

SCROLL FOR NEXT