MS Dhoni Dance esakal
क्रीडा

MS Dhoni Dance: काला चष्मा...गाण्यावर धोनी-हार्दिकचा जबरदस्त डान्स

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. धोनीचा हा हटके अंदाज पाहता चाहते कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (MS Dhoni Dance)

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याचा हा डान्स व्हिडिओ दुबईचा आहे. बॉलीवूड रॅपर बादशाह त्याच्या 'काला चष्मा' या लोकप्रिय गाण्यावर रॅप करताना दिसत आहे आणि महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या आणि ईशान किशन यांच्यासह अनेकजण त्याच्यासमोर नाचत आहेत. टीम इंडियाचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

स्टार खेळाडू हार्दिक पंड्या नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवून परतत आहे. तिथे त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली. हार्दिक पांड्या सध्या एकदिवसीय मालिकेचा भाग नाही आणि तो दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा एमएस धोनी आता आयपीएल 2023 मध्ये दिसणार आहे. हा आयपीएल सीझन एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एमएस धोनीने आधीच सांगितले आहे की तो आपला शेवटचा टी-20 सामना फक्त चेन्नईमध्येच खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT