क्रीडा

MS Dhoni US Open 2023: यूएस ओपनची सेमीफायनल पाहण्यासाठी गेला थाला, मित्रांसोबतचा video viral

Kiran Mahanavar

MS Dhoni Watching US Open 2023 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. दरम्यान, धोनी यूएस ओपन मॅच पाहताना एक व्हिडिओ समोर आला आहे. स्पर्धेच्या अधिकृत प्रसारकाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यूएस ओपनमध्ये गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात खेळलेला उपांत्यपूर्व सामना पाहण्यासाठी धोनी आला आहे.

या सामन्यात कार्लोस अल्काराझने झ्वेरेवचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता उपांत्य फेरीत कार्लोस अल्काराझचा सामना 3 व्या क्रमांकावर असलेला आणि 2021 यूएस ओपनचा विजेतेपदाचा विजेता डॅनिल मेदवेदेवशी होईल. 2018 नंतर प्रथमच यूएस ओपनच्या 3 माजी विजेत्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायच झाल तर, आयपीएल 2023 हंगाम संपल्यानंतर त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. यानंतर धोनीने पुढचे काही महिने रिहॅबमध्ये घालवले आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या 16व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. सध्या सर्वाधिक आयपीएल विजेतेपदांच्या बाबतीत चेन्नई मुंबई इंडियन्ससह पहिल्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी अनेक फ्रँचायझींनी आधीच तयारी केली आहे. त्याचवेळी चाहत्यांना आशा आहे की धोनी 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामात खेळताना दिसेल. 16 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर धोनीने आपल्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, पुढील हंगामात खेळायचे की नाही हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT