MS Dhoni new Lesson No 7 Advertisement Appreciated by Virender Sehwag and Samantha Prabhu
MS Dhoni new Lesson No 7 Advertisement Appreciated by Virender Sehwag and Samantha Prabhu esakal
क्रीडा

धोनीच्या Lesson No. 7 जाहिरातीचं सेहवाग, समंथानेही केलं कौतुक

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) एक नवी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एका शैक्षणिक कंपनीची ही जाहिरात असून या जाहिरातीचे शिर्षक Lesson No. 7 असं आहे. या जाहिरातीत महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)अनेक अडचणींचा सामना करत त्याच्या मागे लागलेल्या ट्रेनच्या आधी धावण्याचा प्रयत्न करत असताना दिसतोय. या जाहिरातीतून धोनी अनेक समस्यांचा सामना करून आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दाखवलायं. (MS Dhoni new Lesson No 7 Advertisement Appreciated by Virender Sehwag and Samantha Prabhu)

दरम्यान, या शैक्षणिक कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाळ यांनी ट्विट करुन सांगितले की ही जाहिरात तयार करण्यासाठी जवळपास एका वर्षाचा कालावधी लागला आहे.

या जाहिरातीवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, 'ही जाहिरात हेलिकॉप्टर शॉट इतकीच चांगली आहे धोनी. ही तुझी गोष्ट आहे आणि प्रत्येक क्रिकेटरची देखील गोष्ट आहे. मला या जाहिरातीमुळे माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंग ज्यातून जात मी कारकिर्दित मी इतकी उंची गाठू शकलो. आयुष्याचा उत्तम संदेश!'

तर अभिनेत्री समंथा रूथ प्रभूही (Samantha Prabhu) या जाहिरातीवर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली की, 'या जाहिरातीत आयुष्यात येणाऱ्या अडणींवर सफाईदारपणे मात करण्याचा संदेश देण्यात आला आहे. मी ही जाहिरात पुन्हा पुन्हा पाहिली. मला खात्री आहे की मला ज्यावेळी प्रेरणेची गरज असेल त्यावेळी मी ही जाहिरात पुन्हा बघेन.'

या शैक्षणिक कंपनीचे मार्केटिंग हेड करण श्रॉफ यांनी सांगितले की या जाहिरातीवर २५० पेक्षा जास्त लोकांनी ८ महिने काम केले आहे. जाहिरातीचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम ४ पेक्षा जास्त देशांमध्ये करण्यात आले आहे. कारण Lesson No. 7 जाहिरातीत व्हिएफएक्स आणि सीजीआयचा वापर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT