MS Dhoni To Launch Film Production Company 
क्रीडा

MS Dhoni : क्रिकेटनंतर माही फिल्मी जगतात गाजवणार वर्चस्व; या भाषांमध्ये बनवणार मुव्ही

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे आता...

Kiran Mahanavar

MS Dhoni To Launch Film Production Company : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याचबरोबर क्रिकेटनंतर आता माही फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे.

क्रिकेटच्या मैदानानंतर आता महेंद्रसिंग धोनी फिल्मी दुनियेतही आपला कारनामा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महेंद्रसिंगने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. धोनी एंटरटेनमेंट या नावाने ते चालणार आहे. LetsCinema ने रविवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये धोनी दिसत आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पोस्टरनुसार त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्ये चित्रपट बनवले जाणार आहेत. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्यामुळे तामिळनाडूमध्ये त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मागील काही आठवड्यात धोनी जाहिरातीमुळेही चर्चेत आला आहे. Oreo बिस्किट त्याने T20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी लाँच केले. तो युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरसोबत जाहिरातींमध्येही दिसला. धोनी नेहमीच त्याच्या शांत आणि सौम्य स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटही त्याच्यावर बनला आहे, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतने काम केले आहे.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार पक्षाच्या 'हायकमांड'ला भेटण्यासाठी दिल्लीला जात आहेत

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT