Mumbai cricketer Sarfaraz Khan ties knot in Kashmir  
क्रीडा

Sarfaraz Khan Marriage: मुंबईच्या क्रिकेटरने काश्मीर मध्ये जाऊन केलं गुपचूप लग्न! भावी सचिन म्हणून व्हायचं कौतुक... Video Viral

Kiran Mahanavar

Sarfaraz Khan Marriage : भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहणारा युवा फलंदाज सर्फराज खानने गुपचूप लग्न केले. 25 वर्षीय सरफराजने जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील एका मुलीला जोडीदार बनवले. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा सरफराज त्याच्या सासरच्या घरी काळ्या शेरवानीमध्ये दिसत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लग्नासाठी आलेल्या सरफराज खानने एका स्थानिक पोर्टलशी संवाद साधताना सांगितले की, काश्मीरमध्ये लग्न करणे नशिबात होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाने आपल्या भावी कारकिर्दीबद्दल सांगितले की, जर देवाची इच्छा असेल तर मी एक दिवस भारतासाठी नक्कीच खेळेन.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करूनही आणि सातत्याने धावा करत सर्फराजला दीर्घकाळ भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने 2022-23 रणजी ट्रॉफीमध्ये तीन शतकांच्या मदतीने सहा सामन्यांमध्ये 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या. रणजी ट्रॉफी 2021-22 हंगामात त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या होत्या.

आगामी देशांतर्गत हंगामात सरफराज चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेशाचा दावा करताना दिसणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करण्यावरही त्याचे लक्ष असेल. यासोबत त्याचे भावी सचिन म्हणून कौतुक व्हायचं.

सर्फराज आयपीएलद्वारे टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. टिळक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही त्याची उदाहरणे आहेत. या दोन्ही तरुणांनी आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियामध्ये एंट्री केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT