Cameron Green Injury Video
Cameron Green Injury Video 
क्रीडा

Cameron Green: मुंबई इंडियन्स टेन्शन वाढलं 17.50 कोटीचा खेळाडू गंभीर जखमी अन्...

Kiran Mahanavar

Cameron Green Injury Video : IPL फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर आयपीएल 2023 च्या लिलावात 17.5 कोटींमध्ये विकला गेलेला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत जखमी झाला. ग्रीन बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी येथे होणाऱ्या आगामी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार प्रोटीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उशिरा फलंदाजी करताना अॅनरिक नॉर्टजेच्या वाढत्या चेंडूने ग्रीनच्या बोटावर आदळला आणि त्याला दुखापतग्रस्त रिटायर व्हावे लागले. (Cameron Green ruled out of third Test against South Africa due to finger injury)

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एनरिक नॉर्खियाचा वेगवान चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला आणि ग्रीन वेदनांनी ओरडला. यानंतर ग्रीनने हातमोजे काढले तेव्हा त्याच्या बोटातून रक्त येत होते. ग्रीनला तत्काळ मैदानातून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर या खेळाडूला स्कॅनसाठी पाठवण्यात आले.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार कॅमेरून ग्रीनला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याच्या बोटाचे स्कॅन केले गेले. दुखापत गंभीर असल्याने ग्रीन या कसोटी सामन्यात पुढे खेळणार नाही. कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचवेळी चाहते आयपीएल आणि मुंबई इंडियन्ससाठी ही वाईट बातमी म्हणत आहेत.

आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात कॅमेरून ग्रीनसाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढत झाली. प्रत्येकाला त्याचा आपल्या संघात समावेश करायचा होता. अशा परिस्थितीत त्याची किंमत त्याच्या आधारभूत किमतीच्या कितीतरी वर गेली. अखेरीस मुंबई इंडियन्सने ग्रीनला तब्बल 17.5 कोटींना विकत घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT