गतवर्षीच्या विजय हजारे स्पर्धेत विजेतेपद जिंकलेला मुंबईचा संघ 
क्रीडा

हजारे स्पर्धेतील जेतेपद राखण्याचे मुंबईसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चार वर्षांनंतरच्या विश्‍वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी उद्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेद्वारे मिळेल. गतविजेत्या मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरवर आपली क्षमता दाखवण्याबरोबरच मुंबईचे जेतेपद राखण्याकडेही लक्ष द्यावे लागेल.

मुंबई आपली मोहीम सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीने सुरू करणार आहे. एलिट साखळीतील अ गटात मुंबईला आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हैदराबाद, कर्नाटक, झारखंड, गोवा आणि केरळचेही आव्हान असेल. याचबरोबर ब गटातील लढतीकडेही मुंबईला लक्ष द्यावे लागेल. या गटात दिल्ली, ओडिसा, महाराष्ट्र, पंजाब, विदर्भ, हरियाणा, बडोदा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आहेत. अ तसेच ब गटात मिळून अव्वल पाच संघ उपांत्यपूर्व फेरीस पात्र ठरतील. त्यामुळे आव्हान नक्कीच सोपे नसेल. ही स्पर्धा 25 ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे.

मुंबईची मदार कर्णधार श्रेयस अय्यर तसेच अनुभवी सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. तसेच आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेत प्रभावी ठरलेल्या अथर्व अंकोलेकरच्या गोलंदाजीकडेही विशेष लक्ष असेल. अर्थात लांबलेला पाऊस तसेच मार्गदर्शकांची लांबलेली निवड याचा मुंबईच्या पूर्वतयारीवर परिणाम झाला असण्याची शक्‍यता आहे.
मुंबईच्या स्पर्धेतील लढती - 24 सप्टेंबर ः वि. सौराष्ट्र. 25 सप्टेंबर ः वि. झारखंड. 29 सप्टेंबर ः वि. कर्नाटक. 1 ऑक्‍टोबर ः वि. केरळ. 3 ऑक्‍टोबर ः वि. आंध्र प्रदेश. 5 ऑक्‍टोबर ः वि. गोवा. 20 आणि 21 ऑक्‍टोबर ः उपांत्यपूर्व फेरी. 23 ऑक्‍टोबर ः उपांत्य फेरी. 25 ऑक्‍टोबर ः अंतिम फेरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग

SCROLL FOR NEXT