sushil kumar  file photo
क्रीडा

ऑलिम्पिक विजेत्या सुशील कुमारवर 1 लाखाचं बक्षीस

दिल्ली पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याच्याशिवाय त्याचा सहकारी अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

सुशांत जाधव

नवी दिल्ली : पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिस ऑलिम्पिंक विजेत्या सुशील कुमारचा शोध घेत आहेत. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवरील घटनेपासून सुशील कुमार फरार आहे. दिल्ली पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याच्याशिवाय त्याचा सहकारी अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात दिवसागणिक अडचणी वाढत असताना सुशील कुमारकडून दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे. (murder case delhi police eward of rs 1 lakh on wrestler sushil kumar)

दिल्लीतील कोर्टाने छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या वादाच्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) आणि अन्य सहा जणांवर दोन दिवसांपूर्वीच अजामीनपात्र वारंट (Non-bailable warrant) जारी केले होते. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी सुशील कुमार यांच्या विरोधात लुकआउट नोटिस जारी करण्यात आले होते. सागर राणा हत्येप्रकरणात त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार आहे. पोलिस दिल्लीसह हरियाणा आणि अन्य ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी पीडितांची जबान नोंदवली असून सुशील कुमारचा कसून शोध सुरु आहे. अनेक ठिकाणी छापेमारीही करण्यात आलीये. हरिद्वारच्या एका आश्रमामध्ये सुशील कुमार दिसल्याचेही समोर आले होते. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E-commerce Impact on Farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत माल! 4 तासांत पेमेंट; ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर

Kalyan News: नगरसेविका वेटिंगवर, अभिनेत्याला थेट प्रवेश! कल्याण-डोंबिवलीत आयुक्तांना भेटण्यावरून वाद

Ayurvedic Ear Care Tips: कानाचं दुखणं काही केल्या कमी होत नाहीये? मग आयुर्वेदात सांगितलेले 'हे' ४ घरगुती उपाय नक्की करून पाहा

VIDEO : छताचा पत्रा उखडला, चालकानं हातानं ओढून बसवला; लालपरीची दयनीय अवस्था, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Kolhapur Crime: ७ हजारावर आठवड्याला ३ हजार व्याज, महिलेकडून दीड लाख उकळले, संबंध ठेवायला लावले; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT