This is my answer to those who doubt me says PV Sindhu 
क्रीडा

माझ्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना हे उत्तर - सिंधू 

वृत्तसंस्था

बासेल (स्वित्झर्लंड) - गेल्या दोन जागतिक अतिंम स्पर्धेत अंतिम फेरी गाठूनही विजेतेपदावर शिक्कामोर्तब उमटविण्यात अपयश आल्यावर माझ्या झालेल्या टिकेने मी चिडले होते. वाईटही वाटत होते. अशा या सर्व टिकाकारांना या विजेतेपदाने उत्तर दिले, असे मत भारताची जगज्जेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने व्यक्त केले. 

सिंधूने रविवारी जपानची नाओमी ओकुहारा हिचा एकतर्फी लढतीत पराभव करून जागतिक विजेतेपद मिळविले. सिंधूने मिळविलेले स्थान असे आहे गकी, जेथे आजपर्यंत कुणी भारतीय पोचू शकला नव्हता. 

सिंधू म्हणाली,""दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानायला लागल्यामुळे मी देखील निराश होते. मी खेळ उंचावण्याच्या विचारात असतानाच प्रसार माध्यमे मला सातत्याने तु कशी हरली, कारणे काय असे प्रश्‍न सतत विचारून भंडावून सोडत होती. माझ्या मते मी या विजेतेपदाने त्यांना उत्तर दिले.'' 

गेल्या वर्षीची अंतिम लढत आणि या वर्षीची यात फरक करताना सिंधू म्हणाली,""गेल्यावर्षी मी दमले होते यात शंका नाही. तरी जिंकण्याची क्षमता राखून होते. त्यामुळेच विजेतेपदाची लढत हरल्यानंतर स्वतःवरच खूप चिडले होते. तु ही लढत का जिंकू शकली नाहीस ? असा माझा मलाच मी प्रश्‍न विचारत होते. या वेळी मात्र लढत सुरु होण्यापूर्वीच स्वतःशी संवाद साधला आणि कोर्टवर उतरून स्वतःचा नैसर्गिक खेळ करायचा असे बजावले आणि तसाच खेळ केला.'' 

दोन वर्षांपूर्वी सिंधू ओकुहाराविरुद्धच जागतिक लढत हरली होती. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्ण लढतही सिंधूने गमावली. जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेतही ती सोनेरी लढत हरली. गेल्यावर्षी थायलंड आणि इंडियन ओपन स्पर्धेतही ती अंतिम लढत हरली होती. पण, तिने ही मालिका खंडित केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागतिक स्पर्धेत दोन ब्रॉंझ, दोन रौप्य आणि एक सुवर्ण अशी पाच पदके मिळवून सिंधूने चीनच्या ऑलिंपिक चॅंपियन झॅंग निंग हिच्या पाच पदकांच्या कामगिरीशी बरोबरी केली. झॅंगने 2001 ते 2007 या कालावधीत 1 सवर्ण आणि प्रत्येकी दोन रौप्य, ब्रॉंझपदके अशीच कामगिरी केली होती. 

सिंधू म्हणाली,""प्रत्येकाला माझ्याकडून जागतिक विजेतेपदाची भेट हवी होती. रियो ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदकापासून माझ्याविषयीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. स्पर्धा कुठलीही असो, विजेतेपद मीच मिळवावे असे प्रत्येकाला वाटायचे. साधारण त्यानंतर वर्षाने मला इतरांप्रमाणे जागतिक विजेतेपद आपणही मिळवावे असे वाटू लागले. त्यासाठी मी वेगळे असे काहीच प्रयत्न केले नाहीत. फक्त प्रत्येक वेळे शंभर टक्के योगदान देण्याचे ठरवले. मुख्य म्हणजे इतरांचा विचार करणे सोडून दिले. त्यामुळे सहाजिकच दडपण कमी झाले.'' 

आता ऑलिंपिक काही दूर नाही. पण, टप्प्याटप्प्याने मी मजल मारणार आहे. ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होणार आहेत. यात चांगली कामगिरी होईल अशी आशा आहे. पण, सध्या तरी फक्त विजेतेपदाचा आनंद साजरा करणार आहे. त्यापेक्षा वेगळा विचार करूच शकत नाही. 
- पी. व्ही. सिंधू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT