Naomi Osaka news agency
क्रीडा

French Open : मीडियाशी अबोला ओसाकाला पडला 11 लाखाला

पुढील सामन्यातही ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयोजकांनी म्हटले आहे. दंडाची रक्कम तिच्या बक्षीसातून कपात करण्यात येणार आहे.

सुशांत जाधव

जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिच्यावर फ्रेंच ओपनच्या (French Open 2021) पहिल्याच सामन्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सामना जिंकल्यानंतर मीडियासमोर येणे टाळल्यामुळे तिला 15,000 डॉलर (जवळपास 11 लाख रुपये) दंड आकारण्यात आलाय. पुढील सामन्यातही ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयोजकांनी म्हटले आहे. दंडाची रक्कम तिच्या बक्षीसातून कपात करण्यात येणार आहे.

ओसाकाने स्पर्धेपूर्वीच मीडियासमोर न बोलण्याचा पवित्रा घेतला होता. पहिल्या सामन्यानंतर ती आपल्या मतावर ठाम राहिली. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला टेनिसपटूने बुधवारी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. या भूमिकेमुळे माझ्यावर जी दंडात्मक कारवाई केली जाईल ती रक्कम चॅरिटीला देईन, असे तिने म्हटले होते.

यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत नावोमी ओसाकाने दमदार सुरुवात केली आहे. तिने 63 व्या मानांकित पॅट्रिसिया मारिया टिग हिला 6-4, 7-6 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ओसाका दुसऱ्या फेरीतील सामन्यात एना बोग़डन विरुद्ध खेळण्यासाठी कोर्टवर उतरेल.

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे फ्रेंच ओपन स्पर्धा सप्टेंबरमध्ये पार पडली होती. यावेळी एक आठवडा उशीराने स्पर्धेला सुरुवात झालीये. यंदाच्या स्पर्धेसाठी 5000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

महिला गटातील अन्य एका सामन्यात तीन वेळा ग्रँडस्लॅमवर कब्जा करणारी अँजेलिक कर्बर हिला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तिसऱ्यांदा ती फ्रेंच ओपन स्पर्धेतील पहिल्याच राउंडमधून बाहेर पडली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. कर्बरशिवाय दोनवेळचा ग्रँडस्लॅम फायनलिस्टर डोमिनिक थीमला अनभवी पब्लो एंजुअरने पराभूत केले. थीमला 4-6, 5-7, 6-3, 6-4 आणि 6-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

Louvre Museum Robbery : मोनालिसाची पेंटींग असलेल्या म्युझियममध्ये दरोडा, अवघ्या सात मिनिटांत लंपास केले ऐतिहासिक दागिने, कशी झाली चोरी?

No Kings Protest: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निषेधाची आग! नो किंग्ज आंदोलन म्हणजे नेमकं काय? लाखो लोक रस्त्यावर का उतरलेत?

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

SCROLL FOR NEXT