Naomi Osaka twitter
क्रीडा

नाओमीची आणखी एका स्पर्धेतून माघार; विम्बल्डनच काय?

सुशांत जाधव

फ्रेंच ओपन (French Open 2021) स्पर्धेतून माघार घेतलेल्या नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने आणखी एका स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मानसिक तणावत असल्यामुळे जपानी टेनिसपटूने स्पर्धा सोडली होती. त्यानंतर आता तिने बर्लिनमधील डब्ल्यूटीए ग्रास कोर्टवरील स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतलाय.

बर्लिन ओपनच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाओमीने एक आठवड्यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत खेळणे शक्य नाही, असे तिने आयोजकांना कळवले आहे. चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नाओमी फ्रेंच ओपन स्पर्धेतील आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आली होती. स्पर्धेच्या पूर्वीच तिने प्रसारमाध्यमांना समोरे जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तिला 11 लाख रुपयांचा दंडही करण्यात आला. अखेर तिने डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगत दुसऱ्या सामन्यापूर्वीच स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच ओपन पाठोपाठ बर्लिन ओपन स्पर्धेसंदर्भात तिने घेतलेल्या निर्णयानंतर ती विम्बल्डनमध्ये खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

28 जूनपासून विम्बल्डन स्पर्धा रंगणार आहे. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकलाही सुरुवात होईल. या मोठ्या स्पर्धेपासूनही ती दूर राहणार की कोर्टवर उतरुन पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 23 वर्षीय ओसाकाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर डिप्रेशनमध्ये असल्याचे कबूल केले होते. 2018 पासून डिप्रेशनचा सामना करत असून फ्रेंच ओपन स्पर्धेवेळी अस्वस्थ वाटत होते. त्यामुळेच प्रसारमाध्यमांसमोर न जाण्याचा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण नाओमीने दिले होते.

नाओमीने फ्रेंच ओपन स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. तिने रोमानियाची पॅट्रिसिया मारियाला सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यानंतर मीडियासमोर येण्यास तिने नकार दिला. तिने नियमाच उल्लंघन केल्याचे सांगत फ्रेंच टेनिस फेडरेशनने तिच्यावर 11 लाख रुपये दंड आकारला. याशिवाय पुढील सामन्यामध्ये अशी कृती केल्यास कठोर कारवाईचा इशारा फ्रेंच ओपन आयोजकांनी ओसाकाला दिला होता. ती काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला असताना अचानक तिने स्पर्धेतून माघार घेतली. ती डिप्रेशनमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर फ्रेंच ओपनच्या आयोजकांनी तिची माफीही मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT