Naseem Shah IND vs PAK  ESAKAL
क्रीडा

Naseem Shah IND vs PAK : आफ्रिदीने स्तुती केली मात्र त्याच खेळाडूने बाबर आझमचे वाढवले टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

Naseem Shah IND vs PAK : आशिया कप 2023 मधील सुपर 4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. भारताकडून पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमध्ये झालेला हा सर्वात मोठा पराभव होता. त्यानंतर श्रीलंकेनेही पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत त्यांचे आशिया कपची फायनल खेळण्याचे मनसुबे उधळून लावले.

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्यात पाकिस्तान पराभूतच झाला नाही तर त्यांना दोन मोठे धक्के देखील बसले. त्यांचे दोन अव्वल वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि नसीम शाह हे दुखापतग्रस्त झाले. त्यांना श्रीलंकेविरूद्धचा सामना देखील गमावावा लागला. आता नसीम शाह हा भारतात होणाऱ्या वर्ल्डकपला देखील मुकणार असल्याची माहिती मिळत आहे.

नसीम शाह वर्ल्डकपमधील सुरूवातीचे काही सामने मुकेल असे बाबर आझमने सांगितले होते. मात्र त्याच्या खांद्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तो संपूर्ण वर्ल्डकपला मुकण्याची दाट शक्यता आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार नसीमचे दुबईत झालेल्या स्कॅनमध्ये त्याच्या खांद्याला जबर दुखापत झालेली आहे. तो 2023 चा उर्वरित हंगाम मुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सेकंड ओपिनियन घेणार आहे.

भारत - पाकिस्तान सामन्यावेळी 46 व्या षटकात नसीमने मैदान सोडले होते. त्यानंतर त्याला आशिया कपच्या अर्वरित सामन्याला देखील मुकावे लागले. नसीम हा वर्ल्डकप पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेला देखील मुकणार आहे.

झमान खान घेणार नसीमची जागा?

नसीम जर संपूर्ण वर्ल्डकपला मुकला तर पाकिस्तान आपल्या संघात झमान खानचा समावेश करण्याची शक्यता आहे. या वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात चांगले पदार्पण केले होते. त्याने शेवटच्या षटकात जवळपास 8 धावा डिफेंड केल्या होत्या.

पाकिस्तान भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपली मोहीम 6 ऑक्टोबर पासून सुरू करणार आहे. त्यांचा पहिला सामना नेदरलँडविरूद्ध होणार आहे. त्यांचा भारताविरूद्धचा सामना हा 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT