Nathan Lyon esakal
क्रीडा

Nathan Lyon : मी अजूनही स्वतःला चिमटा काढतोय... लियॉन पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव झाल्यानंतर असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Nathan Lyon : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने दमदार गोलंदाजी करत दोन्ही डावात मिळून 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे याच सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा देखील पूर्ण केला.

नॅथन लियॉनने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यास सुरूवात केली. त्यावेळी लियॉनला त्याच्या 500 विकेट्स पूर्ण करण्यासाठी पुढच्या कसोटी वाट पहावी लागते का असे वटात होते.

मात्र अखेर लियॉनने आपल्या 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याच. यानंतर प्रतिक्रिया देताना लियॉन म्हणाला, 'दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झालोय यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. मी अजून स्वतःला चिमटा काढतोय.' पाकिस्तानचा फहीम अश्रफ हा लियॉनची 500 वी शिकार ठरला.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन - 133 सामन्यात 800 विकेट्स

  • शेन वॉर्न - 145 सामन्यात 708 विकेट्स

  • जेम्स अँडरसन - 183 सामन्यात 690 विकेट्स

  • अनिल कुंबळे - 132 सामन्यात 619 विकेट्स

  • स्टुअर्ट ब्रॉड - 167 सामन्यात 604 विकेट्स

  • ग्लेन मॅग्राथ - 124 सामन्यात 563 विकेट्स

  • कर्टनी वॉल्श - 132 सामन्यात 519 विकेट्स

  • नॅथन लियॉन - 123 सामन्यात 501 विकेट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT