Nathan Lyon Create History IND vs AUS 2nd Test Day 2
Nathan Lyon Create History IND vs AUS 2nd Test Day 2  esakal
क्रीडा

Nathan Lyon IND vs AUS : नॅथन लयॉन काही अश्विनची पाठ सोडेना; सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी केला मोठा कारनामा

अनिरुद्ध संकपाळ

Nathan Lyon Create History IND vs AUS 2nd Test Day 2 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसी भारताने आपला पहिला डाव बिनबाद 21 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र पहिल्या सत्रात कांगारूंनी भारतीय फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. नॅथन लयॉनने एकट्याने भारताचा बघता बघता निम्मा संघ गारद केला. याचबरोबर नॅथन लयॉनने इतिहास देखील रचला. ऑस्ट्रेलियाकडून दिग्गज गोलंदाजांना जे जमलं नाही ते या पठ्ठ्याने करून दाखवलं.

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लयॉनने केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा अशी टॉप ऑर्डर अवघ्या तीन षटकात गिळून टाकली. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 54 धावा अशी झाली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र लयॉनने हा प्रयत्न देखील हाणून पाडला. त्याने अय्यरची 4 धावांवर शिकार करत भारताला चौथा धक्का दिला.

भारताच्या 66 धावांवर 4 विकेट्स पडल्या होत्या. त्या चारही विकेट्स एकट्या लयॉनने घेतल्या होत्या. यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी 5 व्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचत भारताला शंभरी पार करून दिली. ही जोडी कांगारूंच्या नाकात दम करणार असे वाटत असतानाच टॉड मर्फीने 26 धावांवर अश्विनला बाद केले.

भारताचा निम्मा संघ 125 धावांवर गारद झाला असताना श्रीकार भरत विराट कोहलीला साथ देण्यासाठी मैदानावर आला. मात्र त्याची साथ फक्त 12 चेंडू टिकली. भरत 6 धावांवर असताना लयॉनने त्याला बाद करत आपली पाचवी शिकार केली. ही लयॉनची ऐतिहासिक शिकार ठरली.

नॅथन लयॉनने भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा माईल स्टोन गाठला. अशी कामगिरी करणारा लयॉन हा ऑस्ट्रेलियाचा पहिला गोलंदाज ठरला. याचबरोबर लयॉन भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यात 100 विकेट्स घेणारा अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला.

अश्विनने आदल्या दिवशीच म्हणजे दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी हा माईलस्टोन गाठला होता. त्यावेळी देखील अश्विनने ऑस्ट्रेलियाचे दोन अव्वल फलंदाज मार्नस लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथला एकाच षटकात बाद केले होते. नॅथनने देखील आज भारताच्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराला एकाच षटकात बाद केले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT