IND Vs AUS 3rd Test Nathan Lyon Cheteshwar Pujara
IND Vs AUS 3rd Test Nathan Lyon Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

IND Vs AUS 3rd Test : पुजारा एकटा भिडला! मात्र नॅथनच्या 'लायन' कामगिरीमुळे कांगारू विजयाच्या उंबरठ्यावर

अनिरुद्ध संकपाळ

IND Vs AUS 3rd Test Nathan Lyon Cheteshwar Pujara : ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने भारताची जवळपास संपूर्ण फलंदाजी एकट्याने उडवली. त्याने 64 धावात 8 बळी घेत भारताचा दुसरा डाव एकट्याने 163 धावांवर संपवला.

भारताकडून चेतेश्वर पुजाराने झुंजार 59 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 26 आणि अक्षर पटेलने नाबाद 15 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न लायनने हाणून पाडला. भारताने दुसऱ्या डावात फक्त 75 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कांगारूंना विजयासाठी 76 धावांचे माफक आव्हान मिळाले.

भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्यानंतर कांगारूंचा पहिला डाव 197 धावात संपुष्टात आणला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.

भारतावर दुसऱ्या डावात ही आघाडी कमी करून कांगारूंना आव्हानात्मक टार्गेट देण्याचा दबाव होता. अशा दबावाच्या परिस्थितीत भारताची भिंत पुन्हा एकदा उभी राहिली. सलामीवीर शुभमन गिलने 5 धावा करून रोहितची साथ सोडली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहितने भारताचा डाव पुढे नेण्या सुरूवात केली.

मात्र कर्णधार लयॉनच्या जाळ्यात फसला आणि 12 धावांचे योगदान देत माघारी फिरला. यानंतर विराट कोहली 12 तर रविंद्र जडेजा 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र एका बाजूने चेतेश्वर पुजारा एकहाती किल्ला लढवत होता. तो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंचा नेटाने सामना करत होता.

पुजाराने भारताचे शतक पार करून दिले. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या श्रेयसने आक्रमक धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारताला आघाडी मिळवून देण्यास सुरूवात केली. मात्र स्टार्कने त्याची ही 26 धावांची खेळी संपवली. त्यानंतर श्रीकार भरत देखील 3 धावांचे योगदान देत बाद झाला.

श्रीकार बाद झाल्यानंतर अश्विनने पुजाराला साथ देण्यास सुरूवात केली. पुजारानेही आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले. मात्र अश्विन 16 धावांचे योगदान देत बाद झाला. नॅथन लयॉनने अश्विनची 16 धावांवर शिकार करत आपला पाचवी विकेट पूर्ण केले.

अश्विन बाद झाल्यानंतर पुजाराने काही आक्रमक फटके मारले. मात्र नॅथनने त्याला 59 धावांवर बाद करत भारताला 8 वा धक्का दिला. भारताच्या 155 धावा झाल्या असताना लयॉनने उमेश यादवला शुन्यावर बाद करत भारताला 9 वा धक्का दिला.

त्यानंतर सिराज आणि अक्षरने आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र लायनने सिराजचा त्रिफळा उडवत भारताचा दुसरा डाव 163 धावांवर संपवला. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT