National Sports Competition
National Sports Competition sakal
क्रीडा

National Sports Competition : टेनिसच्या दुहेरीत महाराष्ट्राचे वर्चस्व; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अर्जुन-पूरव, तर ऋतुजा-प्रार्थना यांना सुवर्णपदके

सकाळ वृत्तसेवा

मडगाव - महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके जिंकली. महिला दुहेरीत ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे जोडीने आणि पुरुष दुहेरीत अर्जुन कढे आणि पूरव राजा जोडीने जेतेपद पटकावले. याशिवाय वैष्णवी अडकरला ब्राँझदकावर समाधान मानावे लागले.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजा आणि प्रार्थना जोडीने तेलंगणाच्या रश्मिका भमिडीपती आणि श्राव्या शिवानी जोडीवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जुन-पूरव जोडीला कर्नाटकच्या आदिल कल्याणपूर आणि प्रज्ज्वल देव यांनी झुंजवले. पण तरीही अर्जुन-पूरव जोडीने ७-६, ६-३ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात वैष्णवीने गुजरातच्या वैदेही चौधरीकडून ०-६, २-६ असा पराभव पत्करला. त्यामुळे तिची वाटचाल खंडित झाली. रविवारी ऋतुजा आणि अर्जुन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ऋतुजाचा रौप्यपदक विजेत्या संघातही समावेश होता. त्यामुळे तिला यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिसरे आणि अर्जुनला दुसरे पदक जिंकण्याची संधी असेल.

महाराष्ट्र व सेनादल यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. सुरुवातीला ३-६ अशा पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र सरकारने उत्तरार्धात धडाकेबाज खेळ करीत पूर्ण वेळेत १०-१० अशी बरोबरी झाली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्राने ४-२ असा विजय मिळविला त्याचे श्रेय महाराष्ट्राचा गोलरक्षक मंदार भोईरला द्यावे लागेल. त्याने अप्रतिम गोलरक्षण करीत सेनादलाच्या दोन खेळाडूंना पेनल्टीद्वारा गोल करण्यापासून वंचित ठेवले.

वॉटरपोलोमध्ये सनसनाटी विजय

वॉटरपोलोमध्ये पुरुष गटात उत्कंठावर्धक लढतीत महाराष्ट्राच्या संघाने सेनादलास पेनल्टी शूटआऊट ४-२ असे पराभूत केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ २६ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरी पोहोचला होता. महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ब्राँझपदक मिळवताना कर्नाटक संघाचा १५-६ असा धुव्वा उडवला.

महिला संघाला स्प्रिंटमध्ये

सोनेरी यश

महाराष्ट्राच्या महिला संघाने ट्रॅक सायकलिंगच्या स्प्रिंट प्रकारामध्ये सोनेरी यश मिळवले. या संघातील मयुरी लुटेच्या खात्यावर हे चौथे पदक जमा झाले.

नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेर्णा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रस्त्यावर चालू असलेल्या ट्रॅक सायकलिंगच्या सांघिक स्प्रिंट प्रकारामध्ये मयुरी, सुशिकला आगाशे, आदिती डोंगरे आणि संज्ञा कोकाटे या चौकडीने जेतेपद मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT