National wrestler Pallavi Khedkar desire win medal in Olympics sakal
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचंय राष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकरची भावना

खेड्यात मुलींनी कुस्ती खेळणे म्हणजे अतीच समजलं जाई. परंतु माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. काहीजणांनी हे काय भलतंच म्हणून विरोध करण्याचा प्रयत्न केला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकर मैदानात प्रतिस्पर्ध्यासोबत दोन हात करीत आहे. मात्र, दुसरीकडे परिस्थितीशी तिला लढावे लागत आहे. या दोन्ही लढाया ती नेटाने लढत आहे. मात्र, दुसरी लढाई तिच्यासाठी मोठी जिकिरीची आहे. दात्यांच्या पाठबळामुळे तिने अनेक मैदाने मारलीत. दैनिक सकाळने तिच्या संघर्षाची कहाणी प्रसिद्ध केल्यानंतर तिच्यासाठी मदतीसाठी अनेक हात सरसावले. ही आर्थिक आणि मानसिक मदत लढण्यास प्रेरणा देईल. ती ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी बळ देत राहील, अशी भावना तिने व्यक्त केली. पल्लवी हिने आई मीरा यांच्यासोबत आज दैनिक सकाळच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. खेळाची आणि संघर्षाची दखल घेतल्याने तिच्या पालकांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील यांनी तिचे स्वागत केले. त्यावेळी तिने आपला संघर्ष उलगडला.

ती म्हणाली, की मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. सुरवातीला शाळेत कबड्डी खेळायचे. त्यामुळे मी सराव करायचे. परंतु कबड्डी हा सांघिक खेळ असल्याने मोक्याच्या क्षणी काही जणींमुळे हार पत्करावी लागायची. त्यामुळे मी निराश झाले. परंतु काही प्रशिक्षकांनी वैयक्तिक क्रीडा प्रकाराकडे वळण्याचा सल्ला दिला. माझ्यापुढे ॲथलेटिक्स आणि कुस्ती हे दोन पर्याय होते. त्यात कुस्ती हा मला जवळचा वाटला. त्यामुळे मी या पुरुषी क्षेत्राची मक्तेदारी असलेल्या क्रीडाप्रकाराकडे वळले.

खेड्यात मुलींनी कुस्ती खेळणे म्हणजे अतीच समजलं जाई. परंतु माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. काहीजणांनी हे काय भलतंच म्हणून विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांचा निर्धार पक्का असल्याने त्यांनी मला नाउमेद होऊ दिलं नाही. त्यांच्यासोबत आईही नावे ठेवणाऱ्यांना सुनावले. घरातील सर्वांचा पाठिंबा असल्याने मला लढण्यास बळ मिळाले. ‘सकाळ’सारख्या माध्यमसमूहाने माझी दखल घेत पाठीवर थाप दिली. हे एखाद्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षाही कमी नाही, असेही पल्लवीने सांगितले.आपल्याकडे जपान, चीनपेक्षा खूप कमी सुविधा आहेत. कुस्ती आता वेगवान झाली आहे. त्यासाठी शरीर काटक ठेवावे लागते. डाएट आणि व्यायाम या दोन गोष्टींवर कुस्तीपटूला भर द्यावा लागतो. त्यासाठी सकाळी चार वाजताच दिवस सुरू होतो. व्यायाम केल्यानंतर अभ्यासातही लक्ष देते. दुपारी विश्रांतीनंतर सायंकाळी व्यायाम असा दिनक्रम असतो.

आतापर्यंतची सुवर्ण कामगिरी

पल्लवीने राष्‍ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. मध्य प्रदेशात झालेल्या फेडरेशनच्या स्पर्धेत सुवर्ण पटकावलेय. इतर स्पर्धांमध्येही तिने सुवर्ण कामगिरी केली आहे. ती ६८ किलो वजनगटात खेळते. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे तिचे स्वप्न आहे.

वडील ऊसतोड कामगार

पल्लवी ही पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगाराची मुलगी आहे. सध्या ती राजूर येथील देशमुख महाविद्यालयात शिक्षण घेते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, कोल्हापूरचे संदीप पाटील, ‘साई’चे तान्हाजी नरके, क्रीडा संचालक शरद नवले यांचे तिला सहकार्य आहे. तिला महिन्याला खुराकाला २० हजार रुपये लागतात. वडील रामभाऊ खेडकर पोटाला चिमटा घेऊन कुस्तीसाठीचा खर्च उचलीत आहेत. त्यांचा संघर्ष पाहून परिसरातील लोकही त्यांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोणाकडून प्रायोजकत्व मिळाल्यास वडिलांचा संघर्ष थांबेल, अशी पल्लवीची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT