County Championship Navdeep Saini 
क्रीडा

भारतीय 'स्पीड गन' Navdeep Saini ने इंग्लंडमध्ये केला कहर

कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा झंझावाती वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपल्या गतीने कहर करत आहे.

Kiran Mahanavar

County Championship Navdeep Saini : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. इंग्लंडचा दौरा संपवून टीम इंडिया कॅरेबियन बेटांवर गेली होती. मात्र, काही खेळाडू तिथेच थांबले आणि ते काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा झंझावाती वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपल्या गतीने कहर करत आहे. सध्या, कौंटी चॅम्पियनशिप विभाग 1 मध्ये केंट संघ लँकेशायरशी लढत आहे. विशेष म्हणजे या सामन्यात नवदीपची नजर आता लँकेशायरकडून खेळणारा सहकारी खेळाडू वॉशिंग्टन सुंदरवर आहे.

मँचेस्टरमध्ये केंट आणि लँकेशायर यांच्यात काउंटी चॅम्पियनशिपचा हा सामना 25 जुलैपासून सुरू झाला आहे. केंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे जास्त षटक होऊ शकले नाही. सामन्यात फक्त 34 षटके खेळली गेली. पण भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपला वेग दाखवण्यात यशस्वी ठरला. गेल्या आठवड्यात कौंटी पदार्पणात पाच विकेट घेणाऱ्या सैनीने लँकेशायरविरुद्ध पहिल्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी केंटकडून 34.2 षटके टाकण्यात आली. यापैकी सैनीने 11 षटके टाकली.

सैनीच्या वेगवान चेंडूंना लँकेशायरच्या फलंदाजांनी कोणतेही उत्तर देता आले नाही. त्याने लँकेशायरच्या टॉप ऑर्डरच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 11 षटकात 45 धावा दिल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लँकेशायरने 4 गडी गमावून 112 धावा केल्या होत्या. संघाचा कर्णधार स्टीव्हन क्रॉफ्ट (21) आणि भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (6) नाबाद परतले. आता दुसऱ्या दिवशी सैनीची नजर सुंदरवर असेल आणि तो आपल्या सहकारी खेळाडूला मोठी खेळी करण्यापासून रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT