Navjot Singh Sidhu Patiala Central Jail esakal
क्रीडा

Patiala Jail : माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू जानेवारीच्या अखेरीस तुरुंगातून मुक्त होणार? कारण आलं समोर

आता लवकरच नवज्योतसिंग सिध्दूची तरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्चवली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता लवकरच नवज्योतसिंग सिध्दूची तरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्चवली जात आहे.

पंजाबचे माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) पटियाला तुरुंगात आहेत. 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

मात्र, आता लवकरच नवज्योतसिंग सिध्दूची तरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्चवली जात आहे. सध्या सिध्दू पटियाला मध्यवर्ती कारागृहात (Patiala Central Jail) शिक्षा भोगत आहेत. मात्र, 6 महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेले नवज्योतसिंग सिध्दू आता वेळेपूर्वीच तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळं सरकार त्यांना जानेवारीत मुक्त करू शकतं.

अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच सिध्दूंना पतियाला तुरुंगात भेटायला गेलेल्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच काही वरिष्ठ काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिध्दूंना भेटायला तुरुंगात गेले होते. भेटीनंतर परतलेले एक ज्येष्ठ नेते म्हणाले, सिध्दूंची तुरुंगातील चांगली वर्तणूक पाहता येत्या 26 जानेवारी रोजी त्यांना मुक्त केलं जाऊ शकतं. गेल्या साडेसहा महिन्यांपासून ते पतियाला तुरुंगात आहेत. तिथं ते त्यांच्या कोठडीत क्लार्कचं कामही करत आहेत. तुरुंगात नियम असतानाही त्यांनी सुटीही घेतली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT