Neeraj Chopra clinches Doha Diamond League title  
क्रीडा

Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने फडकावला तिरंगा, विजयाने केली चॅम्पियनशिपची सुरुवात

Kiran Mahanavar

Neeraj Chopra Diamond League : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत तिरंगा फडकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात फेकलेला 88.67 मीटर लांबीचा भाला त्याला डायमंड लीग जिंकण्यासाठी पुरेसा ठरला.

गतविजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे ठेवले.

नीरज स्पर्धेच्या सुरुवातीपासून संभाव्य विजेता होता. पहिल्या प्रयत्नात दमदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला 86.06 मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानीच होता.

तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला 85.47 मीटर असा आणखी कमी दूर गेला. दुसऱ्या प्रयत्नात याकुब 88.63 मीटर भालाफेक करून नीरजच्या जवळ पोहोचला होता. नीरजचा चौथा प्रयत्न फाऊल ठरला आणि पाचव्या प्रयत्नात 84.37 मीटर भालाफेक झाली.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सर्व स्पर्धकांना अडचण होत होती. सहाव्या प्रयत्नात नीरजला 86.52 मीटर लांब भाला फेकता आला. त्याला टक्कर देणाऱ्या जाकुबला 84.76 मीटर भाला फेकता आल्याने नीरजचे जेतेपद निश्चित झाले.

यासह, डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. नीरजने 2021 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. 2018 मधील आशिया स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने सुवर्ण कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT