Nepal Wicketkeeper Aasif Sheikh Video Of Showing Sportsmanship Gone Viral  esakal
क्रीडा

VIDEO: नेपाळच्या 'या' विकेटकिपरचं क्रिकेट जगत का करतयं कौतुक?

अनिरुद्ध संकपाळ

सोशल मीडियावर सध्या नेपाळचा विकेटकिपर (Nepal Wicketkeeper) आसिफ शेख (Aasif Sheikh) याचा व्हिडिओ (Cricket Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. आसिफने आर्यलंड विरूद्धच्या सामन्यात जी खिलाडू वृत्ती दाखवली त्याची चर्चा क्रिकेट (Cricket) जगतात सर्वत्र होत आहे. मंकडिंग आणि इतर प्राकारांमुळे खिलाडू वृत्ती (Sportsmanship) कायम चर्चेत असते त्या पार्श्वभूमीवर नेपाळचा विकेटकिपर आसिफ शेखने जे केले ते मोठमोठ्या स्टार खेळाडूंनी आदर्श घेण्यासारखे आहे.

नेपाळ आणि आर्यलंड (Nepal vs Ireland) यांच्यातील सामन्यात नेपाळचा गोलंदाज कमल सिंह गोलंदाजी करत होता. त्यावेळी आर्यलंडचा फलंदाज मार्क एडायरने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला. मार्कने एक चोरटी धाव घेण्यासाठी आपला पार्टनर अँडी मॅकब्रेनला कॉल दिला. मात्र ही चोरटी धाव घेताना अँडी आणि गोलंदाजाची टक्कर झाली. अँडी धडपडला. इतक्यात गोलंदाज कमलने चेंडू अडवून विकेटकिपर (Wicket Keeper) आसिफ शेखकडे फेकला. ज्यावेळी चेंडू आसिफ शेखच्या ग्लोजमध्ये आला होता त्यावेळी अँडी क्रिजपासून बराच मागे होता. मात्र विकेटकिपर आसिफने अँडीला धावबाद केले नाही.

या सामन्यात आर्यलंडचा संपूर्ण संघ 20 षटकात 127 धावांवर बाद झाला. यात जॉर्ज डॉक्रेलने सर्वाधिक 28 धावा केल्या. नेपाळकडून दीपेंद्र सिंग अैरीने 21 धावात 4 विकेट घेतल्या. त्याचबरोबर अभिनाश शर्माने 26 धावात 2 विकेट घेतल्या. मात्र आर्यलंडच्या 127 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना नेपाळला 20 षटकात फक्त 111 धावांपर्यंतच मजल मारली. दीपेंद्र सिंह अैरीने सर्वाधिक 28 धावा केल्या. आर्यलंडकडून मार्क एडियर सिमी सिंग आणि बॅरी मॅक्राथे यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT