Sanju Samson sakal
क्रीडा

Sanju Samson : भेदभाव! 'BCCI ने संजूच करिअर संपलं...'

बीसीसीआयकडून भेदभाव केला जात असल्याचा चाहत्यांनी केला आरोप

Kiran Mahanavar

Sanju Samson Ind vs Nz 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज क्राइस्टचर्चमध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही, त्यामुळे चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. कारण टीम इंडियाने पुन्हा संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून वगळले आहे.

संजू सॅमसनला संधी देण्यासाठी चाहते सतत आवाज उठवतात, अनेकदा त्याला संधी मिळते पण दीर्घ विश्रांतीनंतर. कारण तेव्हा वरिष्ठ खेळाडू खेळत असतात, याशिवाय त्यांची संघात सातत्याने निवड होत नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग-11 कोणता ही बदल केला नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते. तर त्यांच्या जागी दीपक चहर, दीपक हुड्डा यांना संधी दिली होती.

• संजू सॅमसन एकदिवसीय सामने : 11 सामने, 10 डाव, 330 धावा, 66 सरासरी

• संजू सॅमसनचा वनडेतील डाव : 46, 12, 54, 6*, 43*, 15, 86*, 30*, 2*, 36

मात्र, संजू सॅमसनचे चाहते या निवडीमुळे नाराज झाले आणि नाणेफेकीनंतर लगेचच तो ट्विटरवर ट्रेंडिंग विषय बनला. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या विक्रमाचा हवाला देत चाहत्यांनी बीसीसीआयवर संजू सॅमसनशी जाणीवपूर्वक भेदभाव केल्याचा आरोप केला. चाहत्यांनी लिहिले की, संजू सॅमसन बीसीसीआयसाठी सोपे टारगेट आहे. चाहत्यांनी लिहिले की, बीसीसीआयने संजूच करिअर संपलं .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT