New Zealand A New chokers Lost 3 ICC World Cup Finals In 7 Years esakal
क्रीडा

New Zealand : न्यूझीलंड नवीन चोकर्स! गतविजेत्यांना लोळवले मात्र पाककडून पराभव

अनिरुद्ध संकपाळ

New Zealand A New chokers : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गेल्या 7 वर्षात न्यूझीलंडने तीनवेळा आयसीसी वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. मात्र त्यांना एकदाही ही ट्रॉफी उंचवता आलेली नाही. यंदाही त्यांनी दमदार खेळ करून देखील सेमी फायनलमध्ये कच खाल्ला. 2015 आणि 2019 ला न्यूझीलंड वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहचली होती. मात्र त्यांना अंतिम सामना जिंकता आला नव्हता. तर 2021 मध्ये त्यांनी टी 20 वर्ल्डकप अंतिम फेरीत धडक मारली होती.

न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्स गमावून शेवटच्या षटकात पार केले. कर्णधार बाबर आझमने 53 धावांची तर मोहम्मद रिझवानने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद हारिसने 30 धावा करत त्यांना चांगली साथ दिली.

न्यूझीलंडचे विजयासाठीचे 153 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या पाकिस्तानने 5 षटकात नाबाद 47 धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवानने पहिल्याच षटकात मिळालेल्या जीवनदानाचा चांगला फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली.

पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने आपली भागीदारी अजून वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी 11 षटकात पाकिस्तानला 97 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, बाबारने आपला गिअर बदलला होता. त्याने 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर बाबर आणि रिझवानने आपली भागीदारी शतकापर्यंत नेत सामन्यावरील पकड मजबूत केली.

मात्र बोल्टने बाबरला 53 धावांवर बाद करत ही जोडी 105 धावा झाल्यानंतर फोडली. सामना 45 चेंडूत 48 धावा असा असल्याने न्यूझीलंडला या विकेटनंतर आशेचे किरण दिसू लागले. दरम्यान, रिझवानने अर्धशतक पूर्ण करत डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र सामना बॉल टू रन आला असताना तो 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हारिसने आक्रमक 30 धावा करत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. शेवटी शान मसूदने शेवटच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक ठोकले. तर कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT