new zealand announce squad for t20 world cup  sakal
क्रीडा

T20 World Cup : न्यूझीलंड संघ जाहीर; करार नाकारणाऱ्या 2 खेळाडूंना मिळाली संधी

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 साठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 New Zealand Squad : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 साठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. 2021 च्या विश्वचषकाच्या तुलनेत संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नुकतेच न्यूझीलंडचा केंद्रीय करार नाकारणारे ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम हे देखील या संघाचा भाग असणार आहे. फिन ऍलन हा केंद्रीय करार प्राप्त करणाऱ्या सर्वात नवीन खेळाडूंपैकी एक आहे.

ICC T20 विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसन तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा कर्णधार असणार आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचे झाल्यास, बोल्ड, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी आणि अॅडम मिल्ने सारखे गोलंदाज असणार आहे. इश सोधी फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल, तर मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर त्याला साथ देतील.

ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल आणि जिमी नीशम हे संघात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतील.

न्यूझीलंडचा विश्वचषक संघ - (T20 World Cup Squad New Zealand)

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, इश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लॉकी फर्ग्यूसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

VIDEO : खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण! अपंग पतीला काखेत उचलून घेत महिलेचा ट्रेनने प्रवास; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

SCROLL FOR NEXT