ENG vs NZ 
क्रीडा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे आऊट झाला फलंदाज Video Viral

न्यूझीलंडचा खेळाडू हेन्री निकोल्सच्या नशिबाने काय साथ दिली नाही

Kiran Mahanavar

ENG vs NZ: क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांना भाग्यवान ठरताना आपण अनेकदा पाहिले आहे. काही वेळेस तर फलंदाजाचे सोपे झेल सुटतात, तर कधी ते सहज धावबाद होण्यापासून वाचतात, पण न्यूझीलंडचा खेळाडू हेन्री निकोल्सच्या नशिबाने काय साथ दिली नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात गुरुवारी फलंदाज हेन्री निकोल्स ज्या पद्धतीने आऊट झाला, क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच कोणताही फलंदाज असा बाद झाला असेल. अशाप्रकारे आऊट झालेलं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने 123 धावांपर्यंत 5 विकेट गमावल्या. संघाची 5वी विकेट म्हणून हेन्री निकोल्स पॅव्हेलियनमध्ये परतला. जॅक लीच सामन्यात 56 व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स स्ट्राइक वर होता, त्याने समोर शोट खेळला तेव्हा चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या एंडला जाऊन डॅरिल मिशेलच्या बॅटला लागला. चेंडू थेट मिडऑफमध्ये उभ्या असलेल्या लीजच्या हातात गेला. अशाप्रकारे 19 धावा करून निकोलस अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला. व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

न्यूझीलंड फलंदाज हेन्री निकोल्सने 99 चेंडूत 19 धावा केल्या. जर या सामन्याबद्दल बोलायच झाल तर, हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम लॅथम एकही धाव न काढता स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर बाद झाला. तर विल यंग 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी कर्णधार केन विल्यमसनही फारसे योगदान देऊ शकला नाही आणि त्याने 31 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT