India vs New Zealand Series Schedule  esakal
क्रीडा

India vs New Zealand : नव्या वर्षात न्यूझीलंड भारतात येणार; जाणून घ्या कधी अन् कोठे होणार सामने

अनिरुद्ध संकपाळ

India vs New Zealand Series Schedule : भारताचा बांगलादेश दौऱ्या संपतोय न संपतोय तोच अजून एका दौऱ्याची घोषणा झाली आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौरा करणार आहे. टी 20 वर्ल्डकपनंतर भारताने लेगेचच न्यूझीलंड दौऱ्या केला होता. आता न्यूझीलंड भारतात येणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 18 जानेवारीपासून होणार आहे. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघ 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

न्यूझीलंडचा भारत दौरा हा वनडे मालिकेने सुरू होईल. यातील पहिला सामना 18 जानेवारीला होणार आहे. हा सामना हैदराबद येथे होणार असून दुसरा वनडे सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये होणार आहे. तर तिसरा इंदूर येथे 24 जानेवारीला होणार आहे. न्यूझीलंडने तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यालानंतर तीन सामन्यांची टी 20 मालिका 27 जानेवारीपासून सुरू होईल. तर दुसरा 29 जानेवारीला दुसरा आणि 1 फेब्रुवारीला मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे.

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे पूर्ण शेड्युल

वनडे मालिका

पहिला वनडे सामना 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा वनडे सामना 21 जानेवारी, रायपूर

तिसरा वनडे सामना 24 जानेवारी, इंदूर

टी 20 वर्ल्डकप

पहिला टी 20 सामना 27 जानेवारी, रांची

दुसरा टी 20 सामना 29 जानेवारी, लखनौ

तिसरा टी 20 सामना 1 फेब्रुवारी, अहमदाबाद

भारताने केला होता न्यूझीलंडचा दौरा

भारताने टी 20 वर्ल्डकप मालिकेनंतर लगेचच न्यूझीलंडचा दौरा केला होता. यात तीन सामन्यांची टी 20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. भारताने टी 20 मालिका आपल्या नावावर केली. मात्र वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताला मात दिली. या दोन्ही मालिकेत पावसाने खूपवेळा व्यत्यय आणला. आता न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याची उस्तुकता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT