ENG vs NZ esakal
क्रीडा

ENG vs NZ : चेंडू 38 वेळा सीमारेषेच्या पार! किवींनी 2019 च्या फायनलचे काढले उट्टे, त्या कटू आठवणींना दिली तिलांजली

अनिरुद्ध संकपाळ

ENG vs NZ : 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फक्त चौकारांच्या संख्येमुळे फायनल सामना गमावणाऱ्या न्यूझीलंडने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 9 विकेट्स आणि 13.4 षटके राखून मात दिली.

न्यूझीलंडने इंग्लंडचे 283 धावांचे आव्हान 1 विकेट राखून 36.2 षटकातच पार केले. सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 121 चेंडूत नाबाद 152 धावा ठोकल्या तर भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने 96 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या.

विशेष म्हणजे चौकारांच्या कमी संख्येमुळे वर्ल्डकप जिकण्याची संधी गमावलेल्या न्यूझीलंडने या सामन्यात तब्बल 30 चौकार आणि 8 षटकार मारले. त्यांनी 38 वेळा चेंडू सीमारेषेच्या पार पोहचवला. 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये सान्याबरोबरच सुपर ओव्हर देखील टाय झाली होती. त्यामुळे वर्ल्डकपचा विजेता हा सामन्यातील चौकार आणि षटकारांच्या संख्येवर ठरवण्यात आला. सुपर ओव्हर पकडून इंग्लंडने 26 तर न्यूझीलंडने 17 वेळा चेंडू सीमापार पोहचवला होता.

इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र किवींना सॅम करनने दुसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने विल यंगला शुन्यावर बाद केले. मात्र यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही यश मिळाले नाही.

सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्रने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 273 धावांची भागीदारी रचली. आक्रमक खेळणाऱ्या कॉन्वेने भारतातील आपली दमदार कामगिरी कायम ठेवत 152 धावंचा दीडशतकी तडाखा दिला. तर आपला पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या रचिनने पहिल्याच सामन्यात 123 धावांची नाबाद खेळी करत आपण लंबी रेस का घोडा असल्याचे सिद्ध केले.

तत्पूर्वी, इंग्लंडची पॉवर पॅक्ट बॅटिंग किवींचा फिरकीपुढे फिकी पडली. त्यांना फक्त 50 षटकात 282 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 77 तर कर्णधार बटलरने 43 धावा केल्या.

(World Cup Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT