New Zealand vs Pakistan 2nd Test Match, Umpires Chris Brown, Viral Photo, Icc 
क्रीडा

NZvsPAK : अंपायरच्या डोक्यात नेमकं काय आलं असावं बुवा!

सकाळ ऑनलाईन टीम

New Zealand vs Pakistan, 2nd Test :  क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंशिवाय पंच आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंचाचा असाच काहीसा हटके अंदाज पाहायला मिळाला.  मैदानातील पंच क्रिस ब्राउन आपल्या हॅटवर बॉल ठेवून न्यूझीलंडच्या खेळाडूंची वाट पाहताना दिसले. क्रिकेटच्या मैदानात खेळाडू गेम प्लॅन आखत असताना चेंडू बहुंताशवेळा पंचाच्या हातात दिसतो.

न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान तो पंचांच्या डोक्यावर दिसला. आयसीसीने त्यांचा फोटो अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला असून कॅप्शन सूचवा असे म्हटले आहे. पंचांच्या या हटके अंदाजावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानी फलंदांजाचा फ्लॉप शो पाहून पंच वैतागलेले दिसतात. त्यांनी निराशजनक कामगिरी केल्यानंतर पंचांनी हलके फुलके मनोरंजन केले, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.  याशिवाय अनेक मजेदार कमेंट्स पाहायला मिळथ आहेत. कोणाला गोलंदाजी द्यायचे ठरवा आणि माझ्या हॅटवरील बॉल घेऊन जा, असेच काहीसे पंचाच्या डोक्यात असावे, अशी प्रतिक्रिया एका क्रिकेट चाहत्याने दिली आहे.     
 

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना हॅग्लेय ओवल, ख्रिस्टचर्चच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या दिवसाअखेर पाकिस्तानचा पहिला डाव खल्लास केला. सौउदीनं सलामीवीर शान मसूदला खातेही उघडू दिले नाही. तर दुसरा सलामीवीर अबिद अली 25 धावा करुन माघारी फिरला. अझर अलीच्या (93) कर्णधार मोहम्मद रिझवानच्या (61) आणि फहिम अश्रफ (48) आणि झाफर गोवरने केलेल्या 34 धावांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात फार काळ टिकता आले नाही.

न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक 5 बळी टीपले. त्याने अवघ्या 21 धावाच खर्च केल्या. टीम साउथी आणि ट्रेट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली तर मॅट हॅन्रीने एक विकेट घेत पाकिस्तानच्या संघाला पहिल्या दिवशीच गुंडाळण्यात अल्प पण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघाला 101 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात ते पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ हा सामना जिंकून आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT