Nickecoy Bramwell Broke Usain Bolt Record esakal
क्रीडा

Nickecoy Bramwell : अवघ्या 16 वर्षाच्या धावपटूनं मोडला उसेन बोल्टचा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Nickecoy Bramwell Broke Usain Bolt Record : जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा विक्रम अखेर मोडला. 16 वर्षाच्या निकेकोय ब्रॅमवेलने 51 व्या कॅरिफ्टा गेम्समध्ये उसेन बोल्टचे चॅम्पियनशिप रेकॉर्ड ब्रेक केलं. किंग्स्टनच्या कॅलाबार हायचा विद्यार्धी निकेकोय ब्रॅमवेल ग्रेनेडाच्या किरानी जेम्स अॅथलेटिक्स स्टेडियममद्ये सुरू असलेल्या 17 वर्षाखालील 400 मीटर धावरण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार होता.

दुखापतीतून सावरताच उसेन बोल्टचा विक्रम मोडला

गेल्या महिन्यात ब्रॅमवेलच्या पायाचा स्नायू दुखावला होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर जमैकाच्या या युवा धावपट्टूने मोठा कारनामा केला. ज्यावेळी तो मैदानावर उतरला त्यावेळी त्याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्य चकीत केलं. ब्रॅमवेलने 400 मीटरची स्पर्धा 47.26 सेकंदात पूर्ण केली. त्याने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत बोल्टचे रेकॉर्ड देखील मागं टाकले.

उसेन बोल्टपेक्षाही वेगवान ब्रॅमवेल

उसेन बोल्टने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 47.33 सेकंद वेळ नोंदवून चॅम्पियनशिप रेकॉर्ड केलं होते. त्याने हे रेकॉर्ड 2002 मध्ये केलं होते. मात्र कारानी जेस्म अॅथलेटिक्स स्टेडियमवर ब्रॅमवेलने बोल्टचे 47.33 सेकंदाचे रेकॉर्ड ब्रेक केले त्यानंतर संपूर्ण स्टेडियमने टाळ्याच्या गजरात ब्रॅमवेलचे अभिनंदन केलं.

या स्पर्धेत कॅमरॉन मॅतलिनने 47.96 सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटाकवले. तर सेंट लुसियाचे इगन निलीने 48.16 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकलं.

जमैकाच्या या युवा धावपटूने उसेन बोल्टचा विक्रम मोडल्यानंतर ब्रॅमवेलने सांगितले की, रेकॉर्ड मोडणं हा एक विलक्षण अनुभव आहे. मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रेकॉर्डवर नजर ठेवून होतो. हे रेकॉर्ड मोडल्यामुळे एक वेगळीच भावना निर्माण झाली आहे. मी यासाठी खूप तयारी करत होतो. शर्यतीवेळी देखील मानसिकदृष्ट्या यासाटी तयारी केली होती.

(Sports Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT