nikhat zareen and priti pawar Sakal
क्रीडा

Paris Olympic Boxing 2024 : निखत, प्रीतीचा दमदार पंच; बॉक्सिंगमध्ये महिलांनी ५४ किलो व ५० किलो वजनी गटात गाठली पुढील फेरी

paris olympic latets news in marathi |भारतीय महिला खेळाडूंनी बॉक्सिंग या खेळाची दमदार सुरुवात केली. प्रीती पवार व निखत झरीन यांनी अनुक्रमे ५४ किलो वजनी गट व ५० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुढील फेरी गाठली.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : भारतीय महिला खेळाडूंनी बॉक्सिंग या खेळाची दमदार सुरुवात केली. प्रीती पवार व निखत झरीन यांनी अनुक्रमे ५४ किलो वजनी गट व ५० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुढील फेरी गाठली.

प्रीती पवार हिने शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत व्हीएतनामच्या वो थी किम हिच्यावर ५-० असा विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. प्रीती हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले होते. मात्र, ऑलिंपिकमध्ये ती पहिल्यांदाच सहभागी झाली आहे. सलामीच्याच लढतीत ‘काबिल ए तारीफ’ कामगिरी केली हे विशेष.

निखत झरीन आपला पहिला सामना रविवारी खेळली. तिने जर्मनीच्या मॅक्सी क्लोतझर हिला ५-० असे सहज पराभूत केले. आता पुढील फेरीत निखतसमोर अव्वल मानांकित चीनची खेळाडू वू यू हिचे आव्हान असणार आहे.

टेबलटेनिसमध्ये संमिश्र यश

टेबलटेनिस या खेळामध्ये भारताला रविवारी संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे श्रीजा अकुला, मनिका बत्रा या महिला खेळाडूंनी विजयी वाटचाल केली, तर दुसरीकडे भारताचा ध्वजवाहक शरथ कमल याला पुरुषांच्या एकेरीत हार पत्करावी लागली.

श्रीजा हिने स्वीडनच्या ख्रिस्तीना कालबर्ग हिला ४-० असे नमवले. मनिका हिने ग्रेटब्रिटनच्या ॲना हर्सी हिच्यावर ४-१ अशी मात केली. मात्र, शरथ याला पराभवाचा धक्का बसला. आपले पाचवे ऑलिंपिक खेळत असलेल्या शरथ याला स्लोव्हेनियाच्या डेनी कोझुल याच्याकडून ४-२ अशाप्रकारे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे शरथ याचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रात ३ महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, सरकार काय करते? राहुल गांधी आक्रमक!

नवी सुरुवात ! तेजश्रीच्या मालिकेचं शूटिंग सुरु की नव्या प्रोजेक्टची नांदी ?फोटो आले चर्चेत

Delhi Fuel Ban : जुने वाहन? इंधन नकोच! आजपासून दिल्लीतील पेट्रोल पंपांवर कडक अंमलबजावणी सुरू

BCG Report: पुढील 15 वर्षांत 'हे' क्षेत्र बनणार पैसे छापण्याची मशीन; मध्यमवर्ग असणार गेम चेंजर

Kolhapur : उच्चशिक्षित स्वप्नजाचं मामेभावाशीच लग्न, किरकोळ वादानंतर माहेरी गेली अन्; उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT