nitin menon outstanding umpiring ashes eng vs aus 5th test steve smith run out 
क्रीडा

Video: तिसऱ्या डोळ्याने केली कमाल अन् इंग्लंडच्या खेळाडूंचे हसरे चेहरे एका क्षणात पडले

Kiran Mahanavar

Eng vs Aus 5th Test Steve Smith : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची अॅशेस कसोटी 27 जुलैपासून ओव्हलवर खेळवली जात आहे. या मालिकेतील इतर सामन्यांप्रमाणे या सामन्यातही दोन्ही संघ आपले सर्वस्व देत सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच चाहत्यांना सतत रोमांचक क्रिकेट पाहायला मिळत आहे.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या पाचव्या कसोटीत धावबाद झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर त्याला भारतीय पंच नितीन मेनन यांनी चुकीच्या पद्धतीने आऊट होण्यापासून वाचवले. अखेर काय होते हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया...

नितीन मेनन यांच्या निर्णयाने क्रिकेट जगताला बसला धक्का

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 78 वे षटक इंग्लंड क्रिकेट संघासाठी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स टाकत होता. वोक्सच्या या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ स्ट्राइकवर होता. स्मिथने ख्रिस वोक्सला मिड-विकेटच्या दिशेने खेळवले आणि दोन धावा चोरण्याचा प्रयत्न केला. स्मिथने पहिली धाव सहज पूर्ण केली.

मात्र दुसरी धाव पूर्ण करण्यात त्याला थोडी कसरत करायला लागली. इंग्लंडकडून बदली क्षेत्ररक्षक जॉर्जने स्मिथला बाद करण्यासाठी रॉकेटपेक्षाही वेगाने थ्रो फेकला. त्याचा थ्रो इतका अचूक होता की चेंडू थेट यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला. वेळेत क्रीजवर पोहोचण्यात स्मिथ थोडा चुकला असे वाटत होते. प्रकरण थर्ड अंपायरकडे गेले. पहिल्यांदा तिथले रिप्ले पाहिल्यावर स्मिथ आऊट झाल्याचे वाटले. इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

पण तिसरे पंच नितीन मेनन यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे अधिक बारकाईने आणि गांभीर्याने पाहिले. त्याने आपला वेळ घेतला. त्यानंतर रिप्लेमध्येच अशी एक फ्रेम आली ज्यामध्ये स्मिथ क्रीजवर पोहोचल्याचे दिसत होते. अशा स्थितीत नितीनने स्मिथला नाबाद म्हटले. मेनन यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ट्विटरवर भारतीय पंचाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, 'नितीन मेनन त्यांच्या योग्य निर्णयासाठी कौतुकास पात्र आहेत.' स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात 71 धावांची अप्रतिम खेळी केली, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 6 चौकार दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT