Virat Kohli Novak Djokovic  esakal
क्रीडा

Virat Kohli Novak Djokovic : जेव्हा जोकोविचचा मेसेज पाहून विराट होतो चकीत... दोन दिग्गजांची सोशलवर चर्चा!

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Novak Djokovic : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि टेनिस जगतावर अधिराज्य गाजवणारा नोव्हाक जोकोविच यांच्यातील नवा नवा याराना सध्या चर्चेत आहेत. विराट कोहलीने 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरण्यासाठी आपली मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि नोव्हाक जोकोविच यांच्यात सोशल मीडियावर संदेशाची देवाण-घेवाण झाली असून आता जोकोविचला विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळायची इच्छा झाली आहे. बीसीसीआयनेही यामध्ये उडी घेतली असून विराट कोहलीचा जोकोविचसाठीचा गुलडक मेजेस व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला.

विराट कोहलीने ज्यावेळी त्याचे वनडेतील 50 वे शतक ठोकले होते. त्यावेळी नोव्हाक जोकोविचने स्टोरी ठेवली होती. याबद्दल बोलताना विराट म्हणाला की जागतिक स्तरावरील खेळाडूंशी असा कनेक्ट असणं चांगलं असतं. नव्या पिढीला एक प्रेरणा मिळण्यासाठी ते गरजेचं आहे.

नोव्हाक जोकोविचने नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तर स्मिथने देखील टेनिसमध्ये आपला हात आजमावला. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम जिंकली असून तो यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून 25 ग्रँडस्लॅम विजेता पहिला पुरूष टेनिसपटू होण्याचा मान पटकावण्यासाठी उत्सुक असेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: कंटेंट क्रिएटर करण सोनवणेची 'बिग बॉस मराठी६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT