ross taylor farewell match  Sakal
क्रीडा

VIDEO : मुलांसोबत राष्ट्रगीताला उभा राहिला टेलर; अश्रू झाले अनावर

सकाळ डिजिटल टीम

न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर रॉस टेलर नँदरलंड विरुद्धच्या सामन्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 4 मार्चला हेमिल्टनच्या सेडॉन पार्कच्या मैदानात तो अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. फेअरवेल सामन्यात रॉस टेलर तीन मॅकेंजी, जाँटी आणि एडिलेड या तीन मुलांसह राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या तिन्ही मुलांनी ब्लॅक कॅप्सचा टी शर्ट घातला होता. या टी शर्टवर रॉस टेलर असे नाव लिहिले होते.

रॉस टेलरची पत्नी विक्टोरिया आणि कुटुंबियातील अन्य सदस्यही रॉस टेलरचा 450 आणि अखेरचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर टेलरला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. देशासाठी अखेरचा सामना आणि न्यूझीलंड ताफ्यातील सहकाऱ्यांसोबत मैदानात राष्ट्रगीतसाठी उभा राहण्याची अखेरची वेळ असल्यामुळे तो भावूक झाला होता.

रॉस टेलरला आपल्या अखेरच्या सामन्यात अवस्मरणीय खेळी करण्यात अपयश आले. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा बॅटिंगला आला. सलामीवीर मार्टीन गप्टिल 106 (123), हेन्री निकोलस 2(12) बाद झाल्यानंतर रॉस टेलर मैदानात उतरला. त्याने 16 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 14 धावांची खेळी केली. यात त्याने एक गगनचुंबी षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. व्हॅन ब्रीकनं त्याची विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT