nz vs sl 1st test match thrilling New Zealand beat Sri Lanka team India enters WTC final cricket news kgm00 
क्रीडा

WTC 2023 : अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेला थरारक सामना! विजय न्युझीलंडचा अन् अंतिम फेरीत भारत

सकाळ ऑनलाईन टीम

New Zealand vs Sri Lanka : न्यूझीलंडने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला आणि श्रीलंकेवर २ विकेट राखून मात केली. या विजयासह भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला. कर्णधार केन विल्यमसनची नाबाद १२१ धावांची झुंजार खेळी या रोमहर्षक कसोटी विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या डावात १०२ धावांची आणि दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी साकारणारा डरेल मिचेल सामनावीराचा मानकरी ठरला.

न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेरीस १ बाद २८ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी त्यांच्यासमोर २५७ धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेला ९ विकेट बाद करण्याची गरज होती. याच कारणामुळे न्यूझीलंड श्रीलंका यांच्यामधील पहिल्या कसोटीचा अखेरचा दिवस रोमांचकारी ठरेल अशी चिन्हे निर्माण झाली होती अन् झालेही नेमके तसेच. पावसाच्या व्यत्ययामुळे सोमवारच्या पहिल्या सत्रावर पाणी फेरले गेले.

न्यूझीलंडला उर्वरित खेळामध्ये २५७ धावांचे आव्हान ओलांडायचे होते. प्रभात जयसूयनि टॉप संथम (२४ धावा) व हेन्री निकोल्स (२० धावा) यांना पोलियनमध्ये पाठवले, पण न केन विल्यमसन व मा जोडीने १४२ धावांची भागीदारी करीत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. न्यूझीलंड विजयाकडे कूच करतोय असे वाटत असतानाच असिथा फर्नांडो याने मिचेल (८१ धावा), टॉम ब्लंडेल (३ धावा) व मायकेल ब्रेसवेल (१० धावा) यांना बाद करीत करी रंगत निर्माण केली.

अखेरच्या षटकातील खेळ

  • असिथा फर्नांडो गोलंदाज

  • पहिला चेंडू - केन विल्यमसनची एक धाव

  • दुसरा चेंडू - मॅट हेन्रीची एक धाव

  • तिसरा चेंडू - केन विल्यमसनची एक धाव, मॅट हेन्री धावचीत

  • चौथा चेंडू केन विल्यमसनकडून चौकार

  • पाचवा चेंडू निर्धाव

  • सहावा चेंडू - केन विल्यमसनकडून एक धाव (बायद्वारे)

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका- पहिला डाव सर्व बाद ३५५ धावा आणि दुसरा डाव सर्व बाद ३०२ धावा पराभूत वि. न्यूझीलंड पहिला डाव सर्व बाद ३७३ धावा आणि दुसरा डाव ८ बाद २८५ धावा (केन विल्यमसन नाबाद १२१- १९४ चेंडू, ११ चौकार, १ पटकार, डरेल मिचेल ८१, असिथा फर्नांडो ३/६३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच स्टेडियममध्ये राडा! दोन तरुण भिडले, मारहाणीचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

Dam Leakage: डिंभे धरणाला गळतीचे ग्रहण; वर्षाला दोन टीएमसी पाणी वाया जाणार.

Jalgaon News: लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पतीसह तिघांना मारण्याचा प्रयत्न, विषप्रयोगानंतर नवविवाहिता फरार; जळगावातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Navratri Day 2 : ब्रह्मचारिणी

SCROLL FOR NEXT