ODI series India vs South Africa second match today  sakal
क्रीडा

Ind vs SA ODI | भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो'

आज दुसरा सामना, भारताला फलंदाजीत सुधारणा आवश्यकच

सकाळ वृत्तसेवा

पार्ल : सलग दोन कसोटी सामने आणि पहिला एकदिवसीय सामना असे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सलग तीन सामने गमावणारा भारतीय संघासमोर आता एकदिवसीय मालिका राखण्याचे आव्हान आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतल्या उद्या(ता.२१) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला फलंदाजीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा लागणार आहे.(India vs South Africa second match)

गेल्या तिन्ही पराभवांत भारताची फलंदाजी प्रामुख्याने मधली फळी कारणीभूत ठरली आहे. गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिका २-१ अशा फरकाने गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारतीयांनी ५-१ असा विजय संपादन केला होता. यावेळी मात्र मालिका गमाविण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कर्णधार बदलला, फॉरमॅट बदलला तरी भारतीय संघाचे प्रश्न कायम राहिले आहेत. अनुभवी शिखर धवन आणि विराट कोहली यांनी भक्कम पायाभरणी केल्यानंतर मधल्या फळीने दगा दिला. त्यानंतर शार्दूल ठाकूरने अर्धशतकी खेळी करून इतर फलंदाजांनी योगदान दिले असते तर विजय मिळवता आला असता हे दाखवून दिले होते, यातून उद्याच्या सामन्यासाठी बोध घेतला जाणार का, हा प्रश्न आहे.

कालचा सामना झालेल्या पार्लच्या मैदानावरच उद्याचाही सामना होत आहे. खेळपट्टीवर गवत नाही, त्यामुळे उत्तरार्धात ती संथ होत जाते, त्यामुळे फटकेबाजी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पहिल्या सामन्यात श्रेयस आणि व्यंकटेश अपयशी ठरले. उद्याच्या सामन्यासाठी लगेचच त्यांना वगळले जाणार नाही, परंतु आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्यांना मोठी खेळी करावी लागणार आहे.

भारतीय फिरकीचेही अपयश

गवतापेक्षा माती दिसत असलेल्या येथील खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने फिरकीद्वारे आपले आक्रमण सुरू केले आणि मार्करम या बदली गोलंदाजाने केएल राहुलला बाद केले होते. शम्सीने दोन तर केशव महाराजने एक फलंदाज बाद केला होता, या तुलनेत अनुभवी असलेल्या भारताच्या अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना मिळून एकच विकेट मिळवता आली. लेगस्पिनर चहलविरुद्ध तर बवुमा आणि रॉसी डुसेन या शतकवीरांनी सहजपणे स्विपचा वापर केला होता. त्यामुळे चहलला उद्या संधी मिळाली तर वेगळा मार्ग शोधावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT