ODI World Cup 2023 Ticket Issue esakal
क्रीडा

ODI World Cup 2023 : ज्यावेळी चाहते स्टेडियममध्ये येणंच बंद करतील तेव्हा.... बीसीसीआयवर लोकं एवढे का भडकले?

अनिरुद्ध संकपाळ

ODI World Cup 2023 Ticket Issue : भारतीय क्रिकेट चाहते तसे शांत स्वभावाचे असतात. ते ना मैदानावर ना मैदानाबाहेर गोंधळ घालतात. मात्र भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयने असे काही घोळ घालून ठवलेत की चाहत्यांचा पारा चांगलाच वाढला आहे.

भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप सुरू होत आहे. वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर अला असतानाही बीसीसीआयने सामन्यांची तिकीट विक्री अजून सुरू केलेली नाही. सामन्यासाठीची तिकीट विक्री ही 25 ऑगस्टपासून टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे.

वर्ल्डकपचे वेळापत्रक जून महिन्यात जाहीर झाले होते. मात्र या महिन्याच्या सुरूवातीला आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्डकपच्या वेळापत्रकात मोठे बदल केले.

आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने देखील 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी पाठोपाठ होणाऱ्या सामन्यात अंतर ठेवण्याची मागणी केली आहे. भारताने 2011 मध्येही वनडे वर्ल्डकप आयोजित केला होता. मात्र यावेळी त्यांच्यासोबत बांगलादेश आणि श्रीलंका हे सह आयोजक देखील होते. बीसीसीआय त्यावेळी आर्थिक दृष्ट्या तितका मजबूत नव्हता. मात्र आता बीसीसीआयची आर्थिक ताकद वाढली आहे.

2011 च्या वनडे वर्ल्डकपची तिकीट विक्री ही जून 2010 मध्येच सुरू करण्यात आली होती. त्यामुळे चाहत्यांना दळणवळणाची आणि हॉटेलची सोय करण्यास पुरेसा वेळ मिळाला होता. 2019 चा इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या सामन्याचे देखील वेळापत्रक 12 महिन्यापूर्वीच घोषित करण्यात आले होते. त्यावेळी देखील चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता.

चाहत्यांकडे दुर्लक्ष

भारतीय क्रिकेट बोर्डाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारतीय संघाला जगात सर्वाधिक लोक फॉलो करत असतात. क्रिकेटला लोकप्रीयतेच्या शिखरावर पोहचवण्यात भारतीय चाहत्यांचा महत्वाचा वाटा आहे. मात्र भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये चाहत्यांच्या गरजांची थोडी देखील काळजी घेण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट चाहता अतिरव कपूर यांनी वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत - पाक सामन्यासाठी अहमदाबादचे तिकीट बुक केलं होतं. त्यांनी सुरूवातीला वेळात्रक जाहीर झाल्या झाल्या तिकीट निश्चित करून टाकलं. मात्र त्यानंतर बीसीसीआयने वेळापत्रकात बदल केला.

आता 15 ऐवजी 14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. आता कपूर यांना तीन सप्टेंबरपर्यंत समजणार नाही की त्यांना तिकीट मिळणार आहे की नाही.

अतिव कपूर यांनी मोजले 40 हजार रूपये

कपूर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्ली ते अहमदाबाद जाण्याचे आणि अहमदाबाद ते दिल्ली येण्याचे असे तिकीट बूक केले होते. यासाठी त्यांनी जवळपास 40 हजार रूपये खर्च केले होते. जर मला सामन्याचे तिकीट मिळाले तर मला त्याची फिजीक कॉपी घेण्यासाठी एक दिवस आधी तिथे पोहचावं लागणार आहे. आधीच सर्व किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे खर्चात अजून वाढ होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT