ODI World Cup Tickets sakal
क्रीडा

ODI World Cup Tickets: ICC राहिले मागे अन् गांगुलीच्या भावाने जाहीर केली वर्ल्ड कपची तिकिटे, जाणून घ्या किंमत

Kiran Mahanavar

ODI World Cup Tickets : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गेल्या महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र आतापर्यंत आयसीसीने तिकिटांच्या किंमती आणि विक्रीबाबत मौन बाळगले आहे.

दरम्यान, कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (सीएबी) तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसह एकूण 5 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा भाऊ सीएबीचे अध्यक्ष स्नेहशीष गांगुली यांनी विश्वचषक सामन्यांचे तिकीट दर जाहीर केले. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धही येथे महत्त्वाचा सामना खेळणार आहे. याशिवाय दुसरी उपांत्य फेरीही येथेच होणार आहे. या मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना 28 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर-1 आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. या सामन्यात वरील स्टँडमधील तिकिटाची किंमत रु. 650 आहे. डी, एच ब्लॉकसाठी 1000 आणि बी, सी, के एल ब्लॉकसाठी 1500 रुपये आहे.

पाकिस्तानचा इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कोलकातामध्ये सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकीट दर अप्पर टियरसाठी 800 रुपये, डी, एच ब्लॉकसाठी 1200 रुपये, सी, के ब्लॉकसाठी 2000 रुपये आणि बी, एल ब्लॉकसाठी 2200 रुपये असतील.

या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यांमध्ये अप्पर टियरसाठी 900 रुपये, डी, एच ब्लॉकसाठी 1500 रुपये, सी, के ब्लॉकसाठी 2500 रुपये आणि बी, एल ब्लॉकमध्ये बसण्यासाठी 2500 रुपये पेक्षा जास्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT