Ollie Pope IND vs ENG esakal
क्रीडा

Ollie Pope IND vs ENG : इंग्लंडच्या उपकर्णधाराने पारडं झुकवलं; पोपमुळे जिंकणारा भारत आलाय टेन्शनमध्ये

India Vs England : ओली पोपने पराभवाच्या दाढेतून सामना काढला बाहेर

अनिरुद्ध संकपाळ

Ollie Pope IND vs ENG : इंग्लंड आणि भारत दोघांचे पहिले डाव संपले त्यावेळी इंग्लंड 190 धावांनी पिछाडीवर होती. आता सामना तिसऱ्या दिवशीच संपणार, भारतीय फिरकीपुढे इंग्रज नांग्या टाकणार असं वाटत होतं. भारताने इंग्लंडचा निम्मा संघही गारद केला होता.

मात्र इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपने 196 धावांची झुंजार खेळी केली. त्याने तळातील फलंदाजांसोबत भागीदारी रचत बेन स्टोक्सची रणनिती अवलंबली. त्याने बेन फोक्स, रेहान अहमद आणि टॉम हार्टली यांच्यासोबत भागीदारी रचली.

इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावांचा डोंगर उभा करत भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान दिलं आहे. चौथ्या डावात सामन्याच्या चौथ्या दिवशी हे आव्हान पार करणं दिसतं तितकं सोप नाहीये.

खेळपट्टी जरी संथ झाली असली तरी चेंडू असमान उसळी घेत आहे. त्यामुळे भारतासमोर आक्रमक क्रिकेट खेळण्यासोबतच पाठोपाठ विकेट न गमावण्याचं आव्हान देखील असणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या दिवशी ओली पोपला अक्षर पटेलने जीवनाद दिलं होतं. त्यानंतर आज केएल राहुलने देखील ओली पोपचा झेल सोडला. त्याने या दोन जीवनदानांचा फायदा उचलत 278 चेंडूत 196 धावा ठोकल्या. त्याने बेन फोक्ससोबत 112, रेहान अहमदसोबत 64 तर टॉम हार्टली सोबत 80 धावांची भागीदारी रचली.

पहिल्या डावात देखील इंग्लंडच्या शेपटाने भारताची डोकेदुखी वाढवली होती. दुसऱ्या डावात तर या शेपटाने सामन्याचं पारडंच झुकवलं. पोपने आपल्या 196 धावांच्या खेळीत 21 चौकार मारले. त्याने भारताच्या फिरकीविरूद्ध रिव्हर्स स्विप आणि स्विच हिटचा चांगला वापर केला.

बॅझबॉल क्रिकेट भारतात आणि भारतीय फिरकीपटूंसमोर देखील प्रभावी ठरू शतकं हे इग्लंडच्या उपकर्णधाराने दाखवून दिलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT