Bajrang punia esakal
क्रीडा

ऑलिंपिक पदकविजेता बजरंग चीतपट

जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव

सकाळ वृत्तसेवा

बेलग्रेड : टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावणाऱ्या भारताच्या बजरंग पुनिया याला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये निराशेचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला पुरुष विभागाच्या ६५ किलो वजनी गटाच्या लढतीत अमेरिकेच्या यिआन्नी डायकोमिहालीस याच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुवर्णपदक जिंकण्याच्या शर्यतीमधून त्याला बाहेर यावे लागले.

बजरंग याने याआधी २०१३ मधील जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक, २०१८ मध्ये जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक आणि २०१९ मधील जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर टोकियो ऑलिंपिकमध्येही ब्राँझपदकाला गवसणी घालत बजरंगने आपला आलेख आणखी उंचावला होता. त्यामुळे बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेमध्ये त्याच्याकडून सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा बाळगल्या जात होत्या.

बजरंग याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्युबाचा कुस्तीपटू ॲलेक्झँड्रो तोबीएर याच्यावर ५-४ असा विजय साकारत आगेकूच केली होती; मात्र त्यानंतरच्या लढतीत बजरंगला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. २३ वर्षीय यिआन्नी डायकोमिहालीस याने बजरंगवर तांत्रिक बाबींमध्ये (१०-०) विजय मिळवला.

पंकज, विकीकडून निराशा

पंकज व विकी या भारताच्या दोन कुस्तीपटूंना जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अपयश आले. स्वित्झर्लंडच्या सॅम्यूएल शेररर याने ९७ किलो वजनी गटातील पात्रता फेरीच्या लढतीत विकी याच्यावर विजय मिळवला. तसेच कझाकस्तानच्या असील एताकीन याने ६१ किलो वजनी गटात पंकज याला पराभूत केले.

सागर जगलानला संधी

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला आतापर्यंत घवघवीत यश संपादन करता आलेले नाही. विनेश फोगाट वगळता एकाही कुस्तीपटूला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पदक जिंकता आलेले नाही. रवी दहिया यालाही निराशेचा सामना करावा लागला. बजरंग पुनियाही सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. आता भारताला सागर जगलान याच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. सागर ७४ किलो वजनी गटात ब्राँझपदकासाठी लढणार आहे. त्याच्यासमोर इराणच्या योन्स एलिकबर इमामिचोघेई याचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT