vidit.jpg
vidit.jpg 
क्रीडा

ऑनलाइन चेस ऑलिंपियाड! नाशिकच्या विदितकडून अर्मेनियाचा पराभव; भारताची उपांत्‍य फेरीत धडक

अरुण मलाणी

नाशिक : जागतिक बुद्धिबळ संघटने (फिडे)तर्फे आयोजित जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत शुक्रवारी (ता. २८) उपउपांत्‍य फेरीत भारतीय संघाने अर्मेनियाचा उत्कंठावर्धक लढतीत पराभव करून उपांत्‍य फेरीत धडक घेतली आहे. सोबत ऐतिहासिक विजयाकडे भारतीय संघाची वाटचाल सुरू आहे. 

आरोनियनला विजयाची संधी न देता अर्धा गुण वसूल

शुक्रवारी झालेल्या सर्व लढती अपेक्षेप्रमाणे तुल्यबळ झाल्या. विश्वनाथन आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आरोनियनविरुद्ध ई ४ हे प्यादे हलवून डावाची सुरवात केली. त्याला आरोनियनने ई ५ ने उत्तर दिले. असे वाटत होते, की डाव रुई लोपेज या प्रसिद्ध ओपनिंग प्रकारात जाईल. परंतु या प्रकारातले आनंदचे कौशल्य जगप्रसिद्ध असल्‍यामुळे आरोनियनने डाव पेट्रो ऑफ या अन्य प्रकारात वळविला. आरोनियनने एक प्याद्याचे बलिदान देऊन थोडी ॲक्टिव्हिटी मिळविण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वी झाल्यासारखा वाटत होता. कारण आनंदच्या सोंगट्या काही प्रमाणात निष्क्रिय झाल्यासारख्या वाटत होत्या. म्हणून आनंदने एक प्यादे परत दिले व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अंतिम पर्वात (एंडगेम) जाताना आनंदकडे एक प्यादे कमी होते. परंतु दोघांकडे एक एक हत्ती असल्याने व सर्व सोंगट्या एकाच बाजूला असल्याने डाव बरोबरीत सुटला. अंतिम पर्व आनंदने खूप छान पद्धतीने हाताळले व आरोनियनला विजयाची संधी न देता अर्धा गुण वसूल केला. 

गॅब्रियल काहीसा गोंधळलाच

दुसऱ्या पटावर गॅब्रियल सेर्गिस्सियन (आंतरराष्ट्रीय रेटिंग २६८२) विरुद्ध भारताचा स्टार खेळाडू विदित गुजराथी हा सामना रंगतदार झाला. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गॅब्रियलने त्याच्या नेहमीच्या डी४ प्याद्याने डावाची सुरवात केली. त्याला विदितने रगोझिन निमझो या हायब्रिड प्रकाराने उत्तर दिले. मागील पाच-सात वर्षांत हा प्रकार जागतिक पातळीवर खूपदा खेळला जात आहे. या प्रकारात विदितचा खूप हातखंडा आहे. ओपेनिंग फेज पूर्ण झाल्यावर विदितने १४ व्या व १५ व्या चालीला डाव बरोबरीत सोडविण्याच्या हेतूने चालींची पुनरावृत्ती (रिपिटेशन) करून गॅब्रियलवर मानसिक दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गॅब्रियल काहीसा गोंधळला. 

जिंकलेला डाव भारतासाठी अतिशय महत्त्वाचा

अठराव्या चालीनंतर पटावर हँगिंग पौन स्ट्रक्चर निर्माण झाले. ते विदितने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले व पकड ढिल्ली होऊ दिली नाही. शेवटी विदितची स्‍थिती काहीशी जोखमीची वाटत होती, कारण त्याच्या ३८ व्या एफ ६ चालीनंतर गॅब्रियलला थोडी आघाडी मिळाल्यासारखे वाटत होते. परंतु गॅब्रियलने ५३ वी क्‍यूडी ७ ही चुकीची चाल खेळून आपला महत्त्वाचा मोहरा गमावला. अर्थात विदितच्या चिवट व प्रखर झुंजीमुळे हा जिंकलेला डाव भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. काळ्या मोहऱ्यांनी एवढ्या मोठ्या खेळाडूला हरविणे खूप आव्हानात्मक असते. परंतु विदितने ही कमाल करून दाखविली. त्याचप्रमाणे द्रोणावल्ली हरिका व निहाल सरीन यांनी सुंदर खेळ करून आपले डाव जिंकल्याने भारताला हा सामना ३.५ विरुद्ध २.५ असा जिंकता आला. 

अर्मेंनियाचे प्रोटेस्ट 

अर्मेंनियाने इंटरनेट समस्‍येमुळे अपील्स समितीकडे तक्रार केली होती. परंतु ती ग्राह्य धरण्यात आली नाही. अपील्स समितीचा अंतिम निर्णय आल्यानंतर भारताला विजयी घोषित करण्यात आले. भारत आता उपांत्‍य फेरीत पोलंड व अझरबैजान या दोन संघातील विजेत्यांशी लढणार आहे.  

जागतिक बुद्धिबळ संघटने (फिडे)तर्फे आयोजित जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत शुक्रवारी (ता. २८) उपउपांत्‍य फेरीत भारतीय संघाने अर्मेनियाचा उत्कंठावर्धक लढतीत पराभव करून उपांत्‍य फेरीत धडक घेतली आहे. सोबत ऐतिहासिक विजयाकडे भारतीय संघाची वाटचाल सुरू आहे. - विनोद भागवत, कॅन्डिडेट मास्टर व फिडे प्रमाणित प्रशिक्षक 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT